काश्मिर : दहशतवादी, सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक; 2 दहशतवाद्यांचा खात्मा

0
जम्मू आणि काश्मिरामध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे.
पुलवामा जिल्ह्यात सकाळी घडलेल्या या चकमकीत दोन कुख्यात दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.
हे दहशतवादी कोणत्या संघटनेचे होते हे अद्याप स्पष्ट झाले नाही. उर्वरीत दहशतवाद्यांचा शोध आणि चकमक अजुनही सुरूच आहे.
पुलवामा जिल्ह्यातील तहाब परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा रक्षकांनी शनिवारी रात्री मिळाली होती. त्यामुळे, रात्रीपासूनच दहशतवाद्यांचा शोध सुरू होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर गोळीबार केला. त्याच प्रत्युत्तर देऊन केलेल्या गोळीबारात 2 दहशतवादी ठार मारले गेले.

LEAVE A REPLY

*