काळी जादूने गुप्तधनाच्या नावाखाली लुटणार्‍या भोंदुबाबासह एकास अटक

0

कर्जत (प्रतिनिधी)- काळी जादू दाखवून गुप्तधन मिळवून देतो, असे म्हणून राज्यात व परराज्यामध्ये 25 कोटींपेक्षा जास्त रकमेला गंडा घालणार्‍या मध्यप्रदेश येथील अब्दूल जावेद अब्दुल समी (वय 48), भारत मुरारी धिंडोरे (वय 40, रा. रेल्वेकॉलनी दौंड जिल्हा पुणे) यांना कर्जत पोलिसांनी अटक केली आहे.

 

 

ही कारवाई कर्जतचे उपविभागीय पोलीस आधिकारी सुदर्षन मुंड व पोलीस निरीक्षक वंसत भोये यांचे मार्गदर्शनाखाली हेडकॉन्सटेबल जयसिंग शेेलार व गणेष ठोंबरेे यांनी केली आहे. या दोघांचा विक्रम जयसिंग पवार हा साथीदार मात्र पसार झालेला आहे. बाळू लक्ष्मण पवार (रा. भांडेवाडी, ता. कर्जत) यांनी कर्ज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यात या दोघांना अटक करण्यात आली आहे.

 

 

अब्दुल जावेद अब्दूल समी व भारत मुरारी धिंडोरे तसेच विक्रम पवार यांचे राज्यात मोठे रॅकेट आहे. या तिघांचे अनेक गावांमध्येएंजट आहेत. त्यांना कमीशन देऊन सावज गळाला लावले जात होते. शेेतात, घरामध्ये गुप्त धन आहे आम्ही ते काढून देऊ मात्र त्यासाठी तुम्हाला खर्च येईल. असे सांगून घर व शेताची पहाणी करायचे. सुरुवातीला हे 11 हजार रुपयांपर्यंत काळ्या जादूसाठी पैसे घेत होते. ही पूजा सुरु असताना तेथे त्या घरातील सर्वांना बसविले जाते.

 

 

बाबाचे इतर साथीदार घरात किंवा शेतात खड्डा घेतात. त्यातील एकजण त्या खड्ड्यामध्ये तोंड बांधलेला हंडा ठेवतात. त्या हंड्यामध्ये एक काळ्या रंगाचा साप असतो. ही सर्व प्रकार झाल्यानंतर संबंधित हस्तक बाबांना इशारा करतो. त्यानंतर बाबा त्या घरातील लोकांना तेथे घेऊन जाऊन तो हंडा ताब्यात घेतो. त्यातील साप बाजूला ठेऊन हंडा संबंधित घरातील प्रमुखाकडे देऊन तो हंडा उघडण्यास मज्जाव करतो. तुम्ही हंडा उघडून बघीतला तर घरातील व्यक्ती मृत्यू होईल, अशी भीती घालतात. त्यामुळे संबंधितांची तारंबळ उडते. याच दरम्यान हंड्यातून एक सोन्याचा तुकडा काढून संबंधितांना सोनाराकडे खात्री करून घेण्यास सांगितली जाते.

 

 

धन खूप आहे, त्यासाठी आणखी पुजा करावी लागेल, असे सांगून 5 लाखांपासून 25 लाखांपर्यंत पैसे घेतले जातात. हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून या टोळीचा सुरु आहे. या टोळीने पवार यांचीही अशाच पध्दतीने फसवणूक करून सुमारे 1 कोटी रुपये लुटले आहे. या प्रकरणी दोन जणांना कर्जत पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. पसार झालेल्या एकाचा पोलीस शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

*