कारागृह अधिक्षकासह शिपायाला पोलीस कोठडी

0

जळगाव / जिल्हा उपकारागृह अधिक्षक डी.टी.डाबेराव व पो.कॉ.बापू आमले या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले.

न्या. के.पी.नांदेडकर यांच्या न्यायालयाने दोघांची दोन दिवस पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

 

जळगाव उप कारागृहातील बंद्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून लाच घेतांना कारागृह अधीक्षक डी.टी. डाबेराव व पो.कॉ. बापू आमले यांना लाच लुचपत विभागाचे डीवायएसपी पराग सोनवणे यांच्या पथकाने पकडले.

अटक करण्यात आलेल्या दोघांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्या. के.पी.नांदेडकर यांच्या न्यायालयासमोर पोलीस कोठडीसाठी युक्तिवाद करण्यात आला.

सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. मोहन देशपांडे यांनी काम पाहिले. पोलीस कोठडीसाठी तपासधिकारी पराग सोनवणे यांनी न्यायालयात संशयित आरोपींनी कारागृहातील इतर बंद्याकडून रुग्णालयात दाखल करण्यासाठी लाच घेतली किंवा नाही याचा तपास करणे आहे.

डाबेराव यांच्या अकोला येथील निवासस्थानाची झडती घेवुन मालमत्तेची चौकशी करणे आहे. तसेच लाच प्रकरणात वरिष्ठ अधिकारी किंवा इतर कर्मचारी अडकले आहेत काय? याचा शोध घेण्यासाठी तीन दिवस पोलीस कोठडीत मिळावी असा युक्तिवाद न्यायालयासमोर केला.

गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून दोघांच्या पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचे सहाय्यक अभियोक्ता अ‍ॅड. मोहन देशपांडे यांनी युक्तिवाद केला.

पुर्व वैमनस्यातुन लावला ट्रॅप
बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. अकिल ईस्माईल व अ‍ॅड. राशिद पिंजारी यांनी काम पाहिले. पुर्व वैमनस्यातुन लाचलुपत विभागात तक्रार देवुन सापळा लावल्याचे अ‍ॅड. ईस्माईल यांनी युक्तिवाद केला.

युक्तीवादादरम्यान होमगार्ड समाधान सोनवणे यांना दि. 18 डिसेंबर 16 रोजी रात्री ते ड्यूटी करत असताना बॅरेक क्रमांक 12 मधील बंदी सतीश गायकवाड याने शिवीगाळ केली होती.

याप्रकरणी डी.टी. डाबेराव यांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला तक्रार दिली. तसेच गायकवाड याच्या वर्तनाविषयी न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग यांच्याकडे तक्रार करीत नाशिक मध्यवर्ती कारागृह येथे गायकवाडला वर्ग करण्याची विनंती केली होती.

या रागातुनच डाबेराव यांच्याविरूध्द लाचलुपत विभागाकडून सापळा लावण्यात आल्याचा युक्तिवाद बचावपक्षातर्फे करण्यात आला.

कारागृहात होमगार्ड नियुक्ती बाबत न्यायालयाकडून डाबेरावला विचारणा
कारागृहात होमगार्डची नियुक्ती बाबत न्यायालयाने डाबेराव यांना विचारणा केली. त्यावर डाबेराव यांनी कारागृहात सुरक्षा रक्षकांची पदे रिक्त असल्याने होमगार्ड नियुक्ती बाबत डीआयजी व आयजी यांच्याशी पत्रव्यवहार केला होता.

तसेच होमगार्ड नियुक्ती बाबत एक परिपत्रकही असल्याचे न्यायालयासमोर डाबेराव यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*