कापडण्यात दीड तास मुसळधार पाऊस ; भात नदीस पूर

0
रामकृष्ण पाटील॰,कापडणे,ता.धुळे-(प्रतिनिधी)- येथे अाज रात्री नऊ वाजेपासुन दीड तास मुसळधार पाऊस झाला. येथे व परिसरात झालेल्या पावसाने गावातील कामगार नगर भागातुन वाहणार्‍या हागर्‍या नाल्यास व भात नदीस मोठा पूर अाला.
वादळामुळे गावातील विज संध्याकाळपासुन बंद अाहे. पिकांचे व जुन्या मातीच्या घरांचेही नुकसान झाले.
 या नाल्याकाठी असलेल्या घरांमध्ये पाणी शिरल्याने या भागातील नागरीकांची एकच धावपळ झाली. या संततधारेमुळे गावातील काही जुन्या मातीच्या घरांची पडझड झाली.
गावातुन वाहत जाणार्‍या या नाल्यास महामार्गापासुन पाणी येत असल्याचे रात्री उशिरापर्यंत पुर ओसरला नव्हता. गावतील बस स्टॅन्ड भागात हा नाला गावाच्या भात नदीस मिळतो.

नदीलाही काही प्रमाणात पाणी अाल्याने नाल्याचे पाणी मागच्या भागात तुंबले व परिणामी कामगार नगर भागातील ग्रामस्थांची धावपळ झाली.

या नाल्यास असा पुर तब्बल दहा वर्षापुर्वी अाला होता. दरम्यान मुसळधार पावसाने शेतकरी राजा सुखावला अाहे. कापडण्याला मुसळदार पाऊसाने कापडणेवासियांना बेसुमार झोडपले.

विजांचा कडकळाटासह झालेल्या वादळी पावसामुळे  संपूर्ण गावाची विज बंद आहे. १० ते १२ वर्षानंतर सर्वात मोठा पूर भात नदीला व हागर्‍या नाल्यास अाला.

वादळ वाऱ्याच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी नुकत्याच लागवड केलेल्या सर्व पिकांचे १०० टक्के नूकसानही झाले आहे.

LEAVE A REPLY

*