कर्तृत्वाचा दीपस्तंभ : नेमिचंद पोद्दार

0

शहरात विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवलेली अनेक माणसे आहेत. त्यापैकी गोसेवा, बांधकाम आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे व्यक्तिमत्त्व म्हणून नेमिचंद पोद्दार यांच्याकडे पाहिले जाते.

स्वत:चा बांधकाम व्यवसाय सांभाळत विविध सामाजिक कार्यामध्ये हिरारीने सहभागी होणारे सामाजहिताची कळकळ असणारा व्यक्ती म्हणून त्यांचाकडे पाहिले जाते. पोद्दार आज 68 व्या वर्षांत पदार्पण करत असून यानिमित्ताने त्याच्या कार्यकर्तृत्वाचा हा थोडक्यात आढावा.

प्रसिद्धीपासून दूर राहत निरलसपणे समाजसेवा करणार्‍याची मोठी परंपरा नाशिकला लाभली आहे. याच परंपरेचा पाईक बनून अनेक वर्षे पोद्दारांचे कार्य अखंडपणे सुरू आहे. सात्विक आणि धार्मिक प्रवृत्तीचा समाजसेवक म्हणून परिसरात त्यांचे नाव लौकीक आहे.

पेठरोडवरील उमराळ नंदिनी गोशाळेस भेट देत तेथील कार्य पाहून प्रत्येकजण भारावून जातो. भीषण दृष्काळजन्य परिस्थितीत तब्बल 400 गायींचे पालनपोषण येथे होते. राज्यभर दुष्काळाची भीषण छाया असल्याने गुरांना चारा पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे.

या अनुषंगाने नंदिनी गौशाळेने दुष्काळग्रस्त शेतकरी की ज्याच्याकडे पशुधन असून चारा-पाण्याची सोय होत नाही, त्यांनी ते गोधन कसायाकडे न देता नंदिनी गोशाळेला कायमस्वरुपी देता येते. तसेच ज्याच्याकडे दुधारू गोधन आहे, मात्र चारापाणी पाणी नाही ते पशुधन तात्पुरत्या स्वरुपात संस्था अटीशर्तींवर सांभाळते. ठराविक कालावधीनंतर ते परत केले जाते.

त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून वनबंधू परिषदेच्या माध्यमातून दुर्गम भागात 270 आदिवासी पाड्यांतील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्हणून एकल विद्यालयाद्वारे त्यांचे साक्षरतेचे कार्य सुरू असून परिषदेच्या नाशिक चॅप्टरच्या संरक्षपदाची धुरा ते सांभाळत आहे.

नाशिककरांची ज्ञानलालसा आणि लक्षात घेता नाशिक सेवा समिती ट्रस्टच्या माध्यमातून धार्मिक कथांचे आयोजनही ते करतात. त्याचबरोबर नाशिककरांचे गृहस्वप्न साकार करण्यामागे त्याच्या निर्माण गु्रपचा सिंहाचा वाटा आहे.

मागील 3 दशकाहून अधिक काळापासून ‘निर्माण’ही घौडदौड सुरू असून आजतागायत हजारो फ्लॅटस् ग्राहकांना उपलब्ध करून दिले आहे. गुणवत्ता, पारदर्शकता आणि प्रामाणिकपणाच्या आधारावर निर्माण गु्रपची विश्वासार्ह परंपरा अखंडपणे सुरू आहे.
                                                                                                                  – अ‍ॅड. भानुदास शौचे

LEAVE A REPLY

*