कर्जमाफी अर्ज भरण्यासाठी मदत कक्ष: आ. पिचड

0

अकोले( प्रतिनिधी)- कर्जमाफीसाठी शेतकर्‍यांना ऑनलाईन फॉर्म भरावा लागत असल्याने अनेक शेतकर्‍यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणे शक्य वाटत नाही. कर्जमाफी अर्ज भरणे प्रक्रिया अनेक तांत्रिक अडचणींना देखील शेतकर्‍यांना तोंड देण्याची वेळ येते. अतिदूर्गम भागात देखील मोठया प्रमाणात शेतकरी असतांना या प्रक्रिया राबवायला कठीण जाते. यामुळे सदर परिस्थितीचा आढावा घेताना अकोले तालुक्याचे आमदार वैभवराव पिचड यांनी या शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचे अर्ज प्रत्येक शेतकर्‍यांकडून सुटसुटीत भरुन घेण्याकरीता शेतकर्‍यांच्या सोयीसाठी अकोले तालुक्यात आमदार जनसंपर्क कार्यालयामध्ये कर्जमाफी अर्ज भरणे मदत कक्ष सुरु केला आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या आघाडी सरकारच्या काळामध्ये शेतकरी अडचणीत सापडल्यानंतर कोणत्याही प्रकारचे निकष न लावता सरसकट शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यात आली. या कर्जमाफीमुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण होते, या योजनेचे तमाम शेतकर्‍यांनी स्वागत केले. परंंतु आता युती सरकारच्या काळामध्ये शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला.

 

 

अनेक नैसर्गिक संकटाना तोंड देताना शेतकरी पुरता हवालदिल झाला. आघाडी सरकारने राज्यामध्ये काढलेली संघर्ष यात्रा तसेच शेतकर्‍यांच्या तीव्र आंदोलनामुळे या युतीसरकारने कर्जमाफीची घोषणा केली परंतु ती घोषणा अनेक निकष ठेवून शेतकर्‍यांच्या भावनांशी खेळ करण्याचा प्रकार केला आहे. या प्रक्रियेमुळे कर्जमाफीची अवघड व किचकट प्रक्रिया राबवित असल्याने पुढील दोन वर्ष तरी कर्जमाफी मिळणे अवघड दिसत आहे.

 

 

तरी अकोले तालुक्यातील एकही शेतकरी वंचित राहणार नाही यासाठी आमदार वैभवराव पिचड यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

 

 

ज्या शेतकर्‍यांना आपल्या गावामध्ये अर्ज भरता आले नाही, काही तांत्रिक अडचण आल्यास अशा शेतकर्‍यांनी आपले कर्जमाफीचे अर्ज आमदार जनसंपर्क कार्यालय कक्षामध्ये येऊन भरावे, असे आवाहन तालुक्याचे लोकप्रिय आमदार वैभवराव पिचड तसेच अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष गिरजाजी जाधव व सेक्रेटरी यशवंतराव आभाळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*