कर्जमाफीबद्दल सरकार सकारात्मक – विधान परिषदेत मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

0

मुंबई |  प्रतिनिधी :  कर्जमाफीबद्दल सरकार सकारात्मक आहे. कर्जमाफीसाठी ३० हजार ५०० कोटींची तरतूद करावी लागणार आहे. राज्याची खर्च करण्याची क्षमता नाही. त्यामुळे नव्याने कामे हातात घेऊ शकणार नाही. तसेच जे शेतकरी कर्ज फेडत आहेत त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी नवी योजना आणत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली.

देवेंद्र फडणवीस

कर्जमाफीचा प्रश्‍न एका दिवसात सुटणार नाही. योजना तयार करण्यासाठी राज्याने केंद्राला विनंती केली आहे. ही योजना केवळ उत्तर प्रदेशसाठी नसून देशासाठी असणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुंडेंचे शरसंधान

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवला. विरोधी पक्षात असताना दिंडी काढून कर्जमाफीची मागणी करणार्‍या मुख्यमंत्र्यांची सत्तेत आल्यानंतर शेतकर्‍यांकडे बघण्याची दृष्टी बदलली आहे.

धनंजय मुंडे

कर्जमाफीच्या मुद्यावर सरकार गंभीर नाही. राज्यातील सर्वपक्षीय आमदारांची शेतकरी कर्जमाफीची एकमुखी मागणी असताना मुख्यमंत्री आपली जबाबदारी केंद्रावर ढकलत असल्याचा आरोप मुंडे यांनी केला.

 

 

संघर्ष थांबणार नाही – चव्हाण

राज्यातील भाजप-शिवसेना सरकार संवेदनशील नसून ते शेतकर्‍यांच्या मुळावर उठले आहे. या सरकारविरोधात सुरू झालेला हा संघर्ष कर्जमाफी घेतल्याशिवाय थांबणार नाही, असा ठाम निर्धार कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी केला आहे.

अशोक चव्हाण

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही येथून संघर्ष यात्रेला सुरुवात झाली. त्यावेळी घेतलेल्या जाहीर सभेत चव्हाण यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. ९ हजारांपेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. तरीही हे सरकार कर्जमाफी करत नाही. या सरकारमध्ये संवेदनाच राहिल्या नाहीत.

 

 

 

सरकारने राजीनामा द्यावा – पवार

राज्य सरकार दिलेल्या कुठल्याच आश्‍वासनांची पूर्तता करीत नाही. निव्वळ पोकळ आश्‍वासने सरकारकडून दिली जात आहेत. नोटबंदी करून सामान्य लोकांना बँकांपुढे उभे केले गेले.

ajit-pawar

अभद्र युती सरकारने आता राजीनामाच द्यावा, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केली.

LEAVE A REPLY

*