करबुडव्यांविरोधात रिझर्व्ह बँकेला कारवाईचे संपूर्ण अधिकार

0

देशातील करबुडव्यांविरोधात कारवाई करण्यासाठी केंद्र सरकार रिझर्व्ह बँकेला कारवाईचे पुर्ण अधिकार देण्याच्या तयारीत आहे.

केंद्रीय मंत्रीमंडळाने अध्यादेशासाठी शिफारस केली असून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आले आहे.

सरकार, बँकर्स आणि आरबीआयने गेले कित्येक महिने यावर विचार करून हा अध्यादेश तयार केला आहे.

राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर दोन ते तीन दिवसांत अध्यादेश जारी होण्याची शक्यता आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही विशिष्ट प्रकरणांमध्ये केंद्र सरकार आरबीआयला सल्ला देऊ शकते. मात्र या अध्यादेशामागचा उद्धेश रिझर्व्ह बँकेला कारवाईचे पुर्ण अधिकार देणे असणार आहे.

LEAVE A REPLY

*