कमल हसन करणार ‘बिग बॉस’चे सूत्रसंचालन

0

‘बिग बॉस’ या प्रसिद्ध रिअ‍ॅलिटी शोच्या तमिळ व्हर्जनचे सूत्रसंचालन कमल हसन करणार आहे.

या दिग्गज अभिनेत्याला टेलिव्हिजनवर पाहण्यास त्यांचे चाहते उत्सुक असतात. तमिळ व्हर्जनच्या बिग बॉसचे ट्रेलर नुकतेच टीझर रिलीज झाले आहे.

य़ामध्ये कमल हसन सलमान खानची नक्कल करताना दिसतोय. तमिळ बिग बॉसचे घर तयार करण्यासाठी तब्बल एक कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.

इव्हीपी थिम पार्कवर बनलेल्या या भव्य घरावर एक कोटी रुपयांपेक्षाही जास्त खर्च करण्यात आला आहे.

सध्या बिग बॉसची टीम शोमध्ये सहभागी होणाऱ्या 15 स्पर्धकांची यादी तयार करत असून, त्यात दोन क्रिकेटपटूंचाही समावेश असेल. या शोचे पहिले पर्व 18 जूनपासून विजय टीव्ही वाहिनीवर सुरु होणार आहे.

हिंदी बिग बॉसचे सूत्रसंचालन अमिताभ बच्चन , सलमान खान, अर्शद वारशी, संजय दत्त यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*