कपिल मिश्रा यांचे ‘आप’वर गंभीर आरोप

0

आम आदमी पक्षातून निलंबित करण्यात आलेले कपिल मिश्रा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

केजरीवाल हे हवाला व्यापार करतात, असा गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

पत्रकार परिषदेत त्यांनी केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला.

तत्पूर्वी, ट्विट करून केजरीवाल यांचा भंडाफोड करणार असल्याचे मिश्रा यांनी म्हटले होते. या वेळी त्यांनी केजरीवाल हे काळा पैसा पांढरा करत असल्याचे म्हटले. या वेळी त्यांनी अरविंद केजरीवाल आणि आपमधील इतर सदस्यांनी मुकेश कुमार नावाच्या व्यक्तीचा शेअर केलेला व्हिडिओ बनावट असल्याचा दावा केला.

हेमप्रकाश शर्मा नावाच्या व्यक्तीला वाचवण्यासाठी केजरीवाल आणि आपने मुकेशकुमारला पुढे केले आहे.

पक्षाला देणगी देणाऱ्या कंपन्यांचे लेटरहेड त्यांनी घरात तयार केले.

सनव्हिजन कंपनीच्या लेटरहेडवरील सही मुकेशकुमार याची नव्हतीच. केजरीवाल आणि आपवर मी आरोप करत असल्यामुळे कदाचित माझी हत्याही होऊ शकते, अशी भीती मिश्रा यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

*