कझाकिस्तानात पंतप्रधान नरेंद्र मोदी व नवाझ शरीफ यांची भेट!

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ या दोघांनी कझाकिस्तानची राजधानी अस्ताना येथे परस्परांची भेट घेतली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शांघाय सहकार्य संघटना (एससीओ) शिखर संमेलनापूर्वी या दोन्ही नेत्यांनी परस्परांची भेट घेऊन एकमेकांच्या तब्यतेची विचारपूस केली. विशेष म्हणजे दोन्ही देशांच्या सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. याचदरम्यान दोघांची भेट झाली आहे.

नवाज शरीफ यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया झाल्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये झालेली ही पहिलीच भेट होती. त्यामुळे मोदींनी शरीफ यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

भारत-पाकिस्तानला शुक्रवारी या संघटनेचे सदस्यत्व बहाल केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

*