‘ऑपरेशन खुकरी’ मध्ये शाहरुख?

0

शाहरुख खानची रेड चिलीज एण्टरटेन्मेन्ट ही निर्मिती संस्था भारतीय सेनेच्या ‘ऑपरेशन खुकरी’वर चित्रपट काढणार असल्याचे कळते.

एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, रेड चिलीजचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि महागडा प्रोजेक्ट असणार आहे.

अजुर एण्टरटेन्मेन्ट आणि रेड चिलीज संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती करतील.

या चित्रपटातून भारतीय भूदल आणि वायूसेनेच्या साहसाला सलाम करण्यात येणार आहे.

दिग्दर्शक आणि चित्रपटातील कलाकारांची नाव ठरली असून, याचे चित्रीकरण आफ्रिकेत करण्यात येईल.

चित्रपटात शाहरुख खान सैनिकाची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जातेय. यावर्षाच्या अखेरीस चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होईल.

LEAVE A REPLY

*