एलसीबीच्या कर्मचार्‍यावर मर्जी

0

 कारवाईतून वगळले ,  पारदर्शकतेवर प्रश्‍नचिन्ह

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हाद्दीत एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने विविध ठिकाणी छापे टाकले. त्यात स्थानिक गुन्हे शाखेतील एक कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत जुगार अड्ड्यावर मिळून आला. तो पोेलीस असल्याचे समजताच त्यास अभय देण्यात आले. मात्र अन्य व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे छापा टाकणार्‍या अधिकार्‍यांच्या पारदर्शकतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणात पोलीस अधिक्षकांनी  लक्ष घालुन संबंधित कर्मचार्‍याची चौकणी करून दोषी अढळल्यास कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
बुधवारी (दि.17) सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एका नव्या अधिकार्‍यांना शहरातील एका मोठ्या जूगार अड्ड्यावर छापा टाकला. त्यात अनेक आरोपींना ताब्यात घेतले. मात्र त्यात जाळ्यात स्थानिक गुन्हे शाखेचा कर्मचारी या गराड्यात सापडला. कारवाईदरम्यान हा पोलीस कर्मचारी असल्याचे अधिकार्‍यास सांगण्यात आले. पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलीन होऊ नये यासाठी त्याला या गुन्ह्यात घ्यायचे की नाही असा प्रश्‍न अन्य पोलीस कर्मचार्‍यांनी केली. या दरम्यान या कर्मचार्‍याने तेथून धूम ठोकली. त्याच्यावर कारवाई करण्यात आली नाही. फिर्याद दाखल झाल्यानंतर त्याचे नाव वगळण्यात आले होते. त्यामुळे कायदा सर्वांना सारखाच आहे. हे सांगण्यार्‍या पोलीस अधिकार्‍यांकडूनच दुजाभाव करून कर्मचार्‍यांना पाठीशी घातल्याचे उघड होत आहे. या कर्मचार्‍यावर कारवाई न झाल्यामुळे अन्य आरोपींनी पोलीस खात्यातील काही अधिकार्‍यांच्या पारदर्शी कारभारावर प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे.
डॉ. सौरभ त्रिपाठी यांच्या काळात चांगलीच चर्चेत राहीली. आरोपींशी सलगी, अर्थपुर्ण तडजोडी, पिन्या कापसे सोबत अर्थपुर्ण संबंध, पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बदल्या, पंगरमल घटनेतील आरोपींची कॉल डिटेल्स अशा अनेक कारणांनी एलसीबी बदनाम झाली होती. त्यामुळे पोलीस अधिक्षकांना अनेक प्रश्‍नांना तोड द्यावे लागले होते. हीच परिस्थिती कायम राहील्यात येणार्‍या अधिकार्‍यांचा वचक नाही काय असा प्रश्‍न निर्माण होईल. चूक करणार्‍या अधिकार्‍यांना व कर्मचार्‍यांना पाठीशी घालणारे अधिकारी असतील तर ये रे माझ्या मागल्या अशीच परिस्थिती जिल्ह्यात निर्माण होणार आहे.

कारवाईचे चित्र अस्पष्ट
पोलीस कर्मचारी पसार झाल्यानंतर संबंधित अधिकार्‍यांने ही बाब पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या कानावर घातली आहे. या कर्मचार्‍यास हजर होण्यास सांगितल्याची माहीत समजते आहे. मात्र हा कर्मचारी फिर्यादीत घेतला नसून त्याला अभय मिळाल्याचे दिसत आहे. त्यामुळे आरोपीवर कारवाई करण्याची चित्र अस्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

*