एबीबी सर्कलजवळ झालेल्या अपघातात सावतानगर येथील तरुणाचा मृत्यू

0
नवीन नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील महात्मानगर परिसरात असणाऱ्या एबीबी सर्कलनजीक काल(दि.२०) झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मयत तरुणाचे नाव आकाश सुरेश कर्णावट (वय २१ रा.जाजुपार्क, सावतानगर, नवीन नाशिक) असे आहे.  या तरुणाच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वीच वडील वारले होते.

आई आणि बहिणीचा आधार असलेल्या तरुणाचा अपघातात मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताचे कारण समजू शकले नाही.

LEAVE A REPLY

*