एड्स विषाणूला शरीरात सुरक्षित ठेवणार्‍या पेशींचा शोध ?

0

पॅरिस | वृत्तसंस्था :  जीवघेण्या व असाध्य एड्सच्या विषाणूपासून बचाव करण्याची पद्धत शोधल्याचा दावा ङ्ग्रान्समधील शास्त्रज्ञांनी केला आहे. या विषाणूला आश्रय देणार्या, पण लक्षात न येणार्या पेशी त्यांनी हुडकून काढल्या आहेत. एचआयव्हीच्या औषधांचा विषाणूवर प्रभाव पडू नये यासाठी याच पेशीच त्यांना लपवून ठेवतात.

या पेशींचा शोध लावण्यात यश आल्यामुळे एक दिवस या पेशी निष्प्रभ करण्यातही सङ्गलता मिळाली, अशी शस्त्रज्ञांनी अपेक्षा आहे. ङ्ग्रान्समधील सीएनआरएस रिसर्च इन्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले असून त्यामुळे व्हायरल रिझर्वेयर्ससंबधी मौलिक माहिती जाणून घेण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.

नेचर नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या या अध्ययनात असे म्हटले आहे की, एड्सवर उपचार करण्याची रणनिती ठरविण्याच्या दिशेने हे अध्ययन अतिशय उपयुक्त ठरू शकते. एड्सच्या गुप्त विषाणूंना नष्ट करणे हा त्यामागील हेतू आहे.

एचआयव्हीवर आाज तरी कोणताही रामबाण उपचार नाही. ज्यांना या रोगाचा संसर्ग झाला आहे, त्यांना आयुष्यभर त्याला दाबून ठेवणारी औषधे घ्यावी लागतात. कारण शरीराच्या रोगप्रतिकारक यंत्रणेच्या पेशीची छोटी संख्या या व्हायरसला शरीरात सुखरूप राहण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध करून देते.

त्यामुळे उपचार बंद केल्यानंतरसुद्धा हा विषाणू कधीही डोके वर काढू शकतो व शरीरात पसरू शकतो. एड्सग्रस्त व्यक्तीच्या शरीरात २०० अब्ज सीडी ४ टी पेशी अश्तात. त्यांच्यापैकी १० लाखातून एखादी पेशीच विषाणूला लपून राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देते.

LEAVE A REPLY

*