एक लाख मेट्रिक टन खतविक्री

0

नाशिक । खरीप हंगामसाठी शेतकर्‍यांनी युरिया, एमओपी, डीएपी, एसएसपी आदी 1 लाख 4 हजार 338 मेकिट्र टन खताची खरेदी केली आहे. कृषी विभागाकडे अजून 34 हजार 420 मेट्रीक टन खत शिल्लक आहे.

खरीप हंगामासाठी 2 लाख 56 हजार मेट्रीक टन खताची मागणी जि.प. कृषी विभागाने नोंदवली होती.मात्र उत्पादकांनी जुलैअखेर सुमारे 1 लाख 37 हजार 894 मेट्रिक टन रासायनिक खताचा पुरवठा केलेला आहे. रब्बी हंगामातील 28 हजार 316 मेट्रिक टन खत शिल्लक आहे.

खरीप पेरण्या आता पूर्ण होत आल्याने पिकांच्या वाढीसाठी शेतकरी पिकांना डोस देण्यासाठी खताचा वापर आता करण्यास सुरुवात करतील. त्यामुळे कृषी विभागाकडून रासायनिक खताचा साठा तत्पर ठेवण्यात आल्याचे कृषी विभागाने कळवले आहे.

LEAVE A REPLY

*