एकाचवेळी १० अणुभट्ट्यांना केंद्र सरकारची मंजुरी

0

एकाचवेळी १० अणुभट्ट्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे,  इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.

सध्या देशात एकूण २२ अणुभट्ट्या कार्यरत आहेत.

नव्या अणुभट्ट्यांची क्षमता जुन्या अणुभट्ट्यांच्या तुलनेत जास्त असणार आहे.

जुन्या २० अणुभट्ट्या २२० मेगावॉट इलेक्ट्रिक क्षमतेच्या आहेत.

तर २००५ आणि २००६ मध्ये तारापूरमध्ये सुरु करण्यात आलेल्या दोन अणुभट्ट्यांची क्षमता ५४० मेगावॉट इतकी आहे. नव्या अणुभट्ट्यांची क्षमता ७०० मेगावॉट इतकी असणार आहे.

दहा नव्या अणुभट्ट्यांची उभारणी राजस्थानातील माही बंसवाडात, हरियाणातील गोरखपूर, कर्नाटकातील कैगा आणि मध्य प्रदेशातील चुटकामध्ये करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*