एकलव्य जयंतीनिमित्त विविध उपक्रम

0
असलोद / शहादा तालुक्यातील असलोद व सारंगखेडा येथे आदिवासी समाजाचे आराध्य दैवत वीर एकलव्य यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी गावातून ढोल-बासरी, बँडसह मिरवणूक काढण्यात आली.
सारंगखेडा येथे वीर एकलव्य जयंतीनिमित्त गावातील जूनी भिलाटीपासून मिरवणूकीला सुरूवात झाली. सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर वीर एकलव्य यांच्या प्रतिमेची गावातील प्रमुख रस्त्यावरून मिरवणूक काढून भिलाटीत समारोप झाला.
आदिवासी समाज बांधवांनी ढोल-बासरीच्या तालावर पारंपारिक व बँडच्या निनादात नृत्य करीत मिरवणूकीत सहभाग घेतला.
यावेळी सारंगखेड्यासह टेंभा, देऊर, टाकरखेडा, अनरद, पुसनद, कळंबू, कुर्‍हावद, कौठळ आदी गावातील समाज बांधव उपस्थित होते.

कैलास सोनवणे, रणजीत भिल, न्हानभाऊ सोनवणे, पंकज मालचे, पिंटू पाडवी, भरत सोनवणे, प्रविण वळवी, सागर सोनवणे, पिंटू मालचे, संतोष वळवी, दिलीप सोनवणे, फमेश पवार, जिभ्लाऊ सोनवणे व समाज बांधवांनी मिरवणूकीचे नियोजन केले.

सारंगखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोहर पगार, हवालदार रमेश पाटील यांनी वीर एकलव्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.

कार्यक्रमासाठी वीर एकलव्य भिल संघटना व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*