एअर इंडियाच्या 111 विमान खरेदी प्रकरणी CBI कडून गुन्हा दाखल

0

सीबीआयने एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्स विलीनीकरण प्रकरणी चौकशीसाठी एफआयआर दाखल केला आहे.

या विलीनीकरणामुळे सरकारला हजारो कोटींचा तोटा झाला, असं सीबीआयने एफआयआरमध्ये म्हटलं आहे.

सीबीआयने तीन एफआयआर दाखल केले आहेत.

ज्यामध्ये 111 विमानांची खरेदी, विमान लीजवर देणं आणि एअर इंडियाने फायदा होणारे हवाई मार्ग सोडल्याप्रकरणी चौकशीचा समावेश आहे.

एअर इंडियावर 52 हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे.

ज्याच्या व्याजापोटी वर्षाला सरकारला 4 हजार कोटी रुपये मोजावे लागतात. गेल्या पाच वर्षात सरकारने एअर इंडियाला 25 हजार कोटी रुपये दिले असून साल 2032 पर्यंत एवढीच रक्कम द्यावी लागणार असल्याची चर्चा आहे.

या सर्व प्रयत्नांनंतरही एअर इंडियाला वर्षाकाठी 3 हजार कोटी रुपयांचा तोटा होतो.

या सर्व प्रकाराला एअर इंडिया आणि इंडियन एअर लाईन्सचं विलीनीकरण जबाबदार असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

LEAVE A REPLY

*