उपशिक्षणाधिकारी पदाची भरती प्रक्रीया अखेर सुरू

0

गणोरे (वार्ताहर) – राज्यातील शिक्षण विभागातील रिक्त असणार्‍या उपशिक्षणाधिकारी पदाची भरती प्रक्रीया अखेर सुरू होणार आहे. त्या करीता राज्यातील सेवेतील कर्मचार्‍यांना मोठ्या प्रमाणावर संधी मिळणार आहे. सुमारे 450 गुणांच्या परीक्षेतून ही निवड होणार आहे. राज्यशासनाने राज्य लोकसेवा आयोगाला याबाबत पत्र लिहिले असल्याने अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सेवेतील कर्मचार्‍यांना संधी मिळणार आहे.
महाराष्ट्र शिक्षण सेवा गट क संवर्गातून 31 पदे भरली जाणार आहे. जिल्हा तांत्रिक सेवा गट क मधून 82 भदे भरली जाणार आहे. अनुसूचीत जातीकरिता 16 पदे, जमातीकरिता 8 पदे तर विमुक्त जाती जमातीकरिता 13 पदे असून विशेष मागास प्रवर्गाकरिता 3 तर सर्वसाधारण संवर्गाकरिता 83 पदे राखीव असणार आहेत.
या करीता 400 गुणांची लेखी परीक्षा तर 50 गुणांची तोंडी परीक्षा होणार आहे. मात्र ही परीक्षा केवळ मुंबई या एकाच ठिकाणी होणार आहे. या परीक्षेकरिता सेवेचा अनुभव आवश्यक आहे. त्याकरिता महानगरपालिका,अनुदानित खाजगी शाळा, आश्रमशाळा कर्मचारी यांना परीक्षेकरिता अर्ज सादर करता येणार नाही.त्यांना वगळण्यात आलेले आहे हे विशेष.पात्र कर्मचा-यांची एकूण सलग सेवा पाच वर्षे असायला हवी.

यासदंर्भात गुणवत्ता यादी राज्य व जिल्हा तांत्रिक सेवेची वेगळी लावण्यात येणार आहे.या पदाकरिता केवळ ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार आहे.या करीता अपेक्षित असलेली सर्व कागदपत्रे दाखल करण्याची जबाबदारी संबंधितांची असणार आहे. सध्याच्या सेवेत असणार्‍या शिक्षकांना यासाठी अर्ज करण्यात येणार आहे. गत पाच वर्षानंतर राज्यशासनाच्या शिक्षण विभागाची जाहिरात निघाली आहे. त्यामुळे या जाहिरातीकडे अनेकांचे लक्ष लागून होते.

LEAVE A REPLY

*