उद्यान एक्स्प्रेसमधून 37 लाखांची रोकड जप्त

0

बंगळुरुहून मुंबईकडे येणाऱ्या उद्यान एक्स्प्रेसमधून कल्याण रेल्वे स्थानकावर बुधवारी संध्याकाळी 37 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

गाडीतील एका बर्थवर तिकीट निरीक्षकाला बेवारस खोका दिसल्यानं संशय आला.

त्यानंतर रेल्वे पोलिसांना बोलावून हा खोका जप्त करण्यात आला.

खोक्याची तपासणी केली असता, त्यात तब्बल 37 लाख रुपयांची रोकड आढळली.

यामध्ये 100, 500 आणि 2000 हजार रुपयांच्या नोटांचा समावेश आहे.

ही सर्व रक्कम रेल्वेच्या आर्थिक विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*