उत्तरप्रदेशमध्ये ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ चित्रपट ‘टॅक्स फ्री’

0

अक्षय कुमारने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लखनऊमध्ये भेट घेतली.

या भेटीदरम्यान स्वच्छतेच्या विषयावर दोघांमध्ये चर्चा झाली.

उत्तरप्रदेश सरकारने ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ चित्रपटाला राज्यभरात टॅक्स फ्री करण्याची घोषणा केलीये. अक्षयच्या भेटीनंतर योगी आदित्यनाथ यांनी हे आदेश दिलेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छता अभियानावर अक्षयचा ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ हा चित्रपट आधारित असून तो टॅक्स फ्री करण्यासोबतच आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासोबत योगी आदित्यनाथ हा चित्रपट पाहणार आहेत.

या भेटीदरम्यानचा एक फोटो अक्षयने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केलाय.

LEAVE A REPLY

*