उत्तरप्रदेशच्या मंत्री स्वाती सिंह यांनी केले बिअर बारचे उदघाटन, मुख्यमंत्र्यांनी मागितले स्पष्टीकरण

0
उत्तरप्रदेशमधील मंत्री स्वाती सिंह यांचे बिअर बारचे उदघाटन करत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या संपूर्ण प्रकरणावर स्वाती सिंह यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे.
फोटोमध्ये स्वाती सिंह रिबिन कापून बिअर बारचे उदघाटन करताना दिसत आहेत. त्यांच्याबाजूला उभ्या असणा-या लोकांमध्ये अधिका-यांचाही समावेश आहे.
स्वाती सिंह यांनी 20 मे रोजी या बारचे उदघाटन केले.
या संपूर्ण वादावर स्वाती सिंह यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
भाजपाचे नेते दारुबंदीबद्दल बोलतात पण त्यांचे मंत्री उदघाटनाला जातात. त्या बारला परवाना आहे किंवा नाही ते ही अजून स्पष्ट नाही अशी टीका त्रिपाठी यांनी केली.

LEAVE A REPLY

*