उघड्यावर शौचास बसणार्‍या १२ जणांवर गुन्हे

0

जळगाव |  प्रतिनिधी :  शहरातील सालानगर महामार्गे पुल तसेच खेडीगावालगत उघड्यावर शौचास बसणार्‍यांवर मनपाने कारवाई केली. १२ जणांना ताब्यात घेवून त्यांच्यावर एमआयडीसी पोलीसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव महानगरपालिकेतर्फे उघड्यावर शौचालयास बसणार्‍यांविरुध्द कारवाईची मोहिम उघडण्यात आली आहे.

बुधवारी सकाळी ७.३० ही मोहीम मनपा आरोग्य निरीक्षक एन.ई.लोखंडे यांच्या पथकाने केली. युनिट क्रमांक १३ मधील सालारनगर पुलाजवळ तसेच खेडीगावालगत उघड्यावर बसलेल्यांवर कारवाई करण्यात आली. उघड्यावर शौचालयास बसण्यास बंदी असतांनाही नागरीक सर्रास उघड्यावर बसुन अस्वच्छता करीतात.

१२ जणांवर गुन्हे

शौचालयास उघड्यावर बसल्याप्रकरणी टमरेटासह १२ जणांना ताब्यात घेतले. त्यांना एमआयडीसी पोलीसांसमोर हजर करण्यात आले. यानंतर त्यांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. याठिकाणी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आले मनपा सुत्रांनी सांगितले.

यांच्यावर गुन्हा दाखल

खेडीमधील साई दुकानाजवळील बाबुराव मगन पांचाळ (वय ३३), ज्ञानेश्‍वर एकनाथ पांचाळ (वय २६ रा. साईदुकानाजवळ खेडी), निलेश सुकदेव कदम (वय ३९ रा. शिवाजी महाराज पुतळा), मन्साराम झांबर मराठे (वय ३८), शंकर बादल राठोड (वय ३१), सोमवीर कश्यप (वय २५ रा. महामार्ग पुलावर), बंटी श्रीराम कश्यप (वय २६), भास्कर शिवलाल घाटोळे (वय ५८), मधुकर भगवान इंधे (वय ४६), आत्माराम कौतीक साळुंखे (वय ६५), अरुण वसंत भालेराव (वय ४२), प्रविण सुरेश राऊत (वय २४) यांच्यावर मुंबई पोलीस अधिनीयम १९५१ मधील कलम ११५,११७ नुसार गुन्हांची नोंद करण्यात आली असल्याचे सुत्रांनी सांगितले.

न्यायालयाने ठोठाविला दंड

एमआयडीसी पोलीसांनी उघड्यावर शौचास बसलेल्या १२ जणांना जिल्हा न्यायालयात हजर केले. न्या.शिंदे यांच्या न्यायालयासमोर कामकाज निघाले. न्यायालयाने १२ जणांना प्रत्येकी २०० रुपये दंड ठोठाविला.

LEAVE A REPLY

*