इस्रोतर्फे जीसॅट 9 उपग्रहाचे प्रक्षेपण

0

इस्रो आज 11 व्या मोहिमेचं प्रक्षेपण होणार आहे.

सार्क देशांपैकी पाक वगळता नेपाळ, भूतान, मालदीव, बांगलादेश आणि श्रीलंका या देशांनी या मोहिमेत सहभागी होण्यास सहमती दर्शवली आहे.

दक्षिण आशियाई उपग्रह जीसॅट 9 च्या प्रक्षेपणाचं काऊण्टडाऊन अंतिम टप्प्यात आलं आहे.

या उपग्रहाच्या माध्यमातून टेलिकम्युनिकेशन्स आणि प्रसारणासंदर्भातील सेवांमध्ये सहकार्य मिळणार आहे.

जीसॅट 9 चं वहन करणाऱ्या जीएसएलव्ही- एम के 2 (GSLV-Mk II) या सॅटेलाईट लाँच वेहिकलचं प्रक्षेपण श्रीहरिकोटातील सतीश धवन स्पेस सेंटरमधून होणार आहे. जीसॅट 9 या दक्षिण आशियाई उपग्रहाचं वजन 421 टन तर लांबी 50 मीटर आहे.

पाकिस्तानने मात्र या योजनेत सहभागी होण्यास नकार दिला आहे.

LEAVE A REPLY

*