इस्त्रो केरोसीनवर चालणारे सेमी-क्रायोजेनिक इंजिन बनवून करणार उपग्रहाचे प्रक्षेपण

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रो सेमी क्रायोजेनिक इंजिनच्या निर्मितीवर काम करत असून, या इंजिनमध्ये पर्यावरणपूरक रॉकेलचा इंधन म्हणून वापर करण्यावर शास्त्रज्ञ काम करत आहेत.
द्रवरुप इंधनापेक्षा रॉकेल हलके असल्यामुळे सामान्य तापमानाला ते साठवून ठेवता येऊ शकते.
सध्या उपग्रह प्रक्षेपणासाठी वापरल्या जाणा-या रॉकेटच्या इंजिनमध्ये द्रवरुप हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या मिश्रणाचा इंधन म्हणून वापर केला जातो.
हे इंधन गोठवून टाकणा-या  (-253) डीग्री सेल्सिअस तापमानाला साठवून ठेवावे लागते. जर सर्व काही ठरल्याप्रमाणे जुळून आले तर, इस्त्रो 2021 मध्ये रॉकेलच्या सहाय्याने सेमी क्रायोजेनिक इंजिनची चाचणी करु शकते.
पारंपारिक हायड्रोजन, ऑक्सिजन इंधनापेक्षा रॉकेल हलके आहे. क्रायोजेनिक इंजिनाच्या वापरामुळे रॉकेटमधील पेलोडची क्षमता चार ते सहा टनांनी वाढेल. सेमी क्रायोजेनिक इंजिन असलेल्या रॉकेटने अवजड उपग्रह प्रक्षेपित करता येऊ शकतात.

 

LEAVE A REPLY

*