‘इमर्जन्सी लोड शेडींग’च्या नावाखालील हेळसांड थांबवा

0

कराड, छल्लारे यांचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा

 

भोकर (वार्ताहर) – श्रीरामपूर तालुक्यातील भोकर परिसरात महावितरणकडून ‘इमर्जन्सी लोड शेडींग’च्या नावाखाली सुरू असलेली हेळसांड थांबवा अन्यथा अबालवृद्धासह राज्य मार्गावर उतरावे लागेल असा इशारा सेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख सदा कराड व जगदंबा युवा प्रतिष्ठानचे गणेश छल्लारे यांनी दिला आहे.
परीसरातील अनेक विहीरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे शेती पंप बंद आहे. ज्या शेतकर्‍यांना जेमजेम पाणी आहे ते ही या ‘इमर्जन्सी लोडशेडीग’ मुळे भरणे शक्य होईना. त्यातच सध्या उन्हाचा प्रचंड कडाका असल्याने इतर उपकरणेही बंद असतात त्यामुळे अबालवृद्धांसह सर्वांनाच याचा त्रास होत आहे. सर्वत्र जीवाची लाहीलाही होत असताना महावितरणकडून अनेकदा अघोषीत भारनियमन केले जात आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून विजेचा अक्षरश: खेळखंडोबा झाला आहे. यात लहान बालकांना व वृद्धांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहेत.
भोकर येथे असलेल्या महावितरणच्या सबस्टेशनमधुन परीसरातील दहा गावांना वीज पुरवठा केला जातो. येथे अपेक्षापेक्षा जादा भार असल्याने गेल्यावर्षी या प्रकाराने परीसरातील ग्राहक त्रस्त झाले होते. मात्र गेल्या काही महिन्यापूर्वी येथे आणखी एक 5 एम.व्ही.ए.चा ट्रान्सफार्मर बसविण्यात आला. आता येथे 5 एम.व्ही.ए.चे तीन ट्रान्सफार्मर झालेत. यातुन शेतीसाठी इतर ग्राहकांसाठी व एक्सप्रेस असे स्वतंत्र फिडर करण्यात आले. आता शेती व इतर असे स्वतंत्र फिडर करण्यात आले आहेत.

 

त्यात शेतीसाठी वडाळामहादेव, खोकर, कारेगाव, कमालपूर, भोकर, माळवाडगाव व वडजाई असे सात फीडर करण्यात आले तर लक्ष्मीमाता मिल्कसाठी स्वतंत्र एक्सप्रेस फीडर व इतर वापरासाठी वडाळा महादेव व घुमनेदव असे दोन फीडर या प्रमाणे एकूण दहा फीडरद्वारे वीज पुरवठा केला जात आहे. त्यामुळे आता सर्व ग्राहकांना पूर्ण दाबाने वीज पुरवठा करणेे सुकर होणार असल्याचे त्यावेळी घोषीत करण्यात आले होते.

 

वीज नसल्याने वाड्यावस्त्यावरील कुटूंबांना उकाड्याला तोंड देण्यासाठी बाहेर उघड्यावर झोपावे लागते. हा प्रकार घातक आहे, परंतु दुसरा पर्याय नाही. नागरिकांना कृत्रीम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. एकंदरीत भोकर सबस्टेशन परीसरातील विज पुरवठ्याच खेळखंडोबा झाल्याचे दिसत असल्याने आता जनतेच्या सहनशिलतेचा अंत बघु नका अन्यथा अबालवृद्धांसह रस्त्यावर उतरून रास्तारोको अंदोलन छेडले जाणार असल्याचे कराड व छल्लारे यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

*