इचलकरंजी येथील बबलू नवलेच्या खूनाचा निषेध

0
नंदुरबार / कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील बबलू नवले या समाजातील युवकाचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली.
या घटनेचा भटके विमुक्त हक्क परिषद व अखिल महाराष्ट्र कंजारभाट समाजातर्फे तीव्र निषेध करण्यात आला आहे.
दरम्यान, घटनेतील संशयितांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

याबाबत भटके विमुक्त हक्क परिषदेतर्फे जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, नातेवाईकांकडे लग्नपत्रिका देण्यास गेलेल्या बबलूने नातेवाईकांचे भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला.

त्यात स्थानिक तरुणांनी बबलू यास बेदम मारहाण करून त्याचा खून केला. या घटनेने राज्यातील भटके-विमुक्त जाती-जमातीतील समाजात असंतोष निर्माण होवून संतापाची लाट तयार झाली आहे.

भटकंती व भिक्षुकी करणार्‍या या निष्पाप बांधवांवर होणारे अन्याय, अत्याचार सातत्याने वाढत असून त्याचवेळी पायबंद घालण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

खटला फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा व सरकारी वकील म्हणून अ‍ॅड.उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी. सदर गुन्ह्याचा शोध सीबीआयकडे वर्ग करण्यात यावा व मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

*