इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदग्रहण

0

अध्यक्षपदी डॉ. चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. अनारसे,
सेक्रेटरी डॉ. कडू तर खजिनदारपदी डॉ. मुंदडा

 

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नूतन पदाधिकार्‍यांचा पदग्रहण समारंभ संपन्न झाला असून या कार्यकमात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. प्रशांत चव्हाण तर उपाध्यक्षपदी डॉ. संजय अनारसे यांची निवड करण्यात आली. सेक्रेटरी म्हणून डॉ. संजय कडू तर खजिनदार म्हणून डॉ. संकेत मुंदडा यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

 
डॉ. वाय. एस. देशपांडे, अध्यक्ष आय.एम.ए. महाराष्ट्र यांच्या अध्यतेखाली आमदार डॉ. सुधीरजी तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत व डॉ. रवींद्र कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन पदाधिकार्‍यांचा पदग्रहण समारंभ संपन्न झाला. वर्ष 2017-18 या वर्षासाठी यावेळी कार्यकारिणी निवडण्यात आली. मावळते अध्य़क्ष डॉ.प्रकाश खुबसद यांनी नवीन पदाधिकार्‍यांना शुभेच्छा दिल्या. मागील वर्षाचे वाचन डॉ. शिरीष शेळके व डॉ. राम कुकरेजा यांनी केले.

 
अध्यक्षीय भाषणात डॉ.देशपांडे, म्हणाले की डॉक्टर व रुग्ण यांच्यातील संवाद हरवत चाललाय. यासाठी डॉक्टर व रुग्ण दोघांनीही प्रयत्न करणे आवश्यक आहे. डॉ.सुधीर तांबे यांनी नवीन पदाधीकार्‍यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. डॉ.प्रशांत चव्हाण यांनी आय.एम.ए. श्रीरामपूर तर्ङ्गे यावर्षी घेण्यात येण्याच्या विविध वैद्यकीय व सामाजिक उपक्रमांबद्दल आपला मानस व्यक्त केला.
डॉ.एन.बी.तुपे व डॉ.दिवाकर चाटुङ्गळे यांचा आय.एम. तर्ङ्गे जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी येथील सर्व मान्यवर डॉक्टरांचे सहकुटुंब उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*