इंजिनिअरिंग डिप्लोमाच्या अभ्यासक्रमात बदल!

0

इंजिनीअरिंग डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम हा आता केवळ पुस्तकी ज्ञानापुरता मर्यादीत राहणार नसून औद्योगिक क्षेत्रात नेमक्या कोणत्या कौशल्याची गरज आहे याचा विचार करून तशा प्रकारचा अभ्यासक्रम बनविण्यात आला आहे.जुन्या अभ्यासक्रमात तब्बल 40 ते 50 टक्के बदल करून या अभ्यासक्रमाला आय-स्किम (आउटकम बेस्ड स्किम) नाव देण्यात आल्याची माहीती  तंत्र शिक्षण मंडळ(एमएसबीटीई)चे उपसचिव डॉ. एम. आर. चितलांगे यांनी दिली आहे.

शिक्षण क्षेत्रातील पक्का माल हा औद्योगिक क्षेत्रात कच्चा माल समजला जातो अर्थात या विद्यार्थ्यांना पुन्हा प्रशिक्षीत करण्याची वेळ औद्योगिक क्षेत्रावर येत असते त्यामुळेच काळानुरूप शिक्षण घेऊन उद्योगांमध्ये आणि खासगी कपन्यांमध्ये चांगली नोकरी मिळावी, यासाठी तंत्र शिक्षण मंडळाने डिप्लोमाचा अभ्यासक्रम यंदापासून बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यंदाच्या 2017-18 या शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रमात आय स्किम लागू होणार असून प्रत्येत विषयात विद्यार्थ्यांला मायक्रो प्रोजेक्ट करावा लागणार आहे. तर, उद्योगांमध्ये चार महिन्यांची इंटर्नशीप करणे अनिवार्य राहणार आहे.

LEAVE A REPLY

*