आश्रम शाळेतील कर्मचार्‍यांची चौकशी करा

0

जि. प. सदस्य डॉ. किरण लहामटे यांची मागणी

 

अकोले (प्रतिनिधी) – अकोले तालुक्यातही आश्रम शाळांमध्ये अनागोंदी कारभार सुरू असून शिक्षण तर बेसुमार आहे. पण जेवण निकृष्ट दर्जाचे असते त्याचा प्रत्यय नुकताच तिरडे आश्रमशाळा येथे आला. तिरडे आश्रम शाळेतील कर्मचारी मुजोर आहे, त्यांची चौकशी करून तातडीने कारवाई करण्याची मागणी जि. प. सदस्य डॉ. किरण लहामटे यांनी केली आहे.

 

 

अकोले तालुक्यातील तिरडे आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अतिशय निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते. विद्यार्थी उपाशी अन् ठेकेदार तुपाशी, अशी गत झाली आहे. भाजप जि. प. सदस्य डॉ. किरण लहामटे यांनी तिरडे आश्रम शाळेला भेट दिली असता हा प्रकार उघडकीस आला.

 

 

स्वयंपाक घरात भेट दिली असता चपात्या काही जळालेल्या तर काही कडक तर निम्या कच्या अशी अवस्था होती. तर भांडरगृहात कोबी, भोपळे, कांदे, बटाटे अतिशय खराब होते तर बर्‍याच डाळी व शेंगदाणे शिल्लक नव्हते.

 

 

विद्यार्थ्यांची भेट घेतली असता कोबी व भोपळ्याची भाजी जास्त वेळा केली जात असल्याची माहिती दिली. दररोज असेच निकृष्ठ भोजन असते तर एका विद्यार्थ्याने मारहाणची सुध्दा तक्रार केली. लहान मुलांचे कापडे धुतले जात नाही.

 

 

यावेळी शिक्षक बगनर व प्रयोगशाळा परिचर धुपेकर यांनी जेवण असेच असते. दोन-चार चपाती जळतात व पावसाळ्यात बटाटे व कांदे खराब होतात, खराब आम्ही फेकून देतो, पण तुम्ही आमचे काय करू शकत नाही, आमचे पुढार्‍यांशी संबंध आहे. धुपेकर तर अरेरावीच्या भाषेत बोलत होता. लगेच प्रकल्प अधिकारी यांनाच बोलावतो तुम्ही काय करणार असेच उत्तर दिले. अधीक्षक एखंडे यांनी मी चार दिवसांपूर्वी कार्यभार घेतला आहे, अशी माहिती दिली.

 

 

तिरडे गावात तुकाराम गोडे यांनी या आश्रम शाळेच्या कारभारावर नाराजी व्यक्ती केली. कारभाराविषयी तक्रार केल्यास शाळा बंद करण्याची धमकी दिली जाते. गावातील विद्यार्थी भोजन करीत नाही? ते आपले घरी भोजन करतात. निकृष्ठ भोजन असते, अशीही माहिती या विद्यार्थांनीही पुष्टी केली. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष भाऊसाहेब वाकचौरे, सरचिटणीस मच्छिंद्र मंडलिक, जालिंदर बोडके, प्रवीण सहाणे आदी उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

*