आयपीएल सट्टा बिनधास्त; भिंगारमध्ये चौघांवर कारवाई

0

 सलग दुसरे प्रकरण उघडकीस

मुंबई इंडीयन्स व किंग्ज इलेवन पंजाबच्या आयपीएलवर लाखो रूपयांचा सट्टा

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुंबई इंडीयन्स व किंग्ज इलेवन पंजाब या आयपीएल क्रिकेट मॅचवर भिंगार येथील आलमगीरमध्ये लाखो रूपयांच्या सट्ट्यावर पोलिसांनी छापा टाकला.

यात तिघांना अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून 71 हजार रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. याप्रकरणी भिंगार पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखील दत्तात्रय कुपाडे (रा. नागरदेवळे), गणेश मंजाबापू कडनर (रा. बोल्हेश्‍वर कॉलनी), विनोद सदाशीव दळे (रा. आलमगीर), पाटील (नाव माहीत नाही) अशी आरोपींची नावे आहेत.

गुरूवारी (दि. 20) रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास आरोपी हे भिंगार भागात श्रीराम कॉलनी आलमगीर रोड जलसा हॉटेलच्या पाठीमागे एका घरात मुंबई इंडीयन्स व किंग्ज इलेवन पंजाब या आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा लावत असल्याची माहीत भिंगार पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कौलास देशमाने यांना समजली होती. त्यांनी सहयक पोलीस अधिक्षक चिन्मय पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसरात सापळा लावून छापा टाकला.

आरोपी हे हार जातीचा सट्टा खेडवत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे यातील तिघांना ताब्यात घेतले असून पाटील नामक व्यक्ती पसार झाला आहे. आरोपींकडून रोख 7 हजार पाचशे रुपये, सॅमसंग टीव्ही, चार मोबाईल, अकडेवारी असलेला कागद असा 71 हजार 700 रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

रात्री या प्रकरणातील तिघांना अटक करून त्यांची कसून चौकशी सुरू होती. त्यांच्याकडून अनेक मोठ्या व्यक्तींची नावे पुढे येण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील पाटील हा या प्रकरणातील सुत्रधार असल्याचे बोलले जात असून त्याच्या मागावर पोलीस पथक पाठविण्यात आले आहे. आज तिघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

सखोल तपासाचे आदेश
शहरात दोन दिवसात दोन कारवाया करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे कोणी जुगार खेळत असले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. जर आयपीएल सट्ट्याबाबत कोणाला काही माहीती असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. कोणत्याही व्यक्तीला पाठीशी घातले जाणार नाही. अटक केलेल्या आरोपींची सखोल चौकशी करून या गुन्ह्यांच्या मुळापर्यंत जाऊन तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
चिन्मय पंडीत (सहायक पोलीस अधिक्षक)

LEAVE A REPLY

*