आमीर खानला झाला स्वाईन फ्ल्यू

0

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे निकाल आज जाहीर होत आहेत.

यासाठी  पुण्यातल्या बालेवाडी येथे सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नीता अंबानी, पाणी फाऊंडेशनचे सत्यजीत भटकळ यांच्यासह अनेक मराठी कलाकार, पाणी विषयातील तज्ज्ञ आणि स्पर्धक गावांमधले अनेक लोक उपस्थित आहेत.

तर अभिनेता आमीर खानने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभागी होऊन आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यावेळी त्यानं बोलताना आपल्याला स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याने कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नसल्याचं स्पष्ट केलं. तसेच आपल्या खास आग्रहास्तव शाहरुख खानने या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याचंही त्यानं यावेळी सांगितलं.

दरम्यान, या कार्यक्रमात मुकेश अंबानींच्या पत्नी नीता अंबानी यांनी मराठीत भाषण केलं.

गेल्या वर्षी 3 तालुक्यांपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत यंदा 30 तालुक्यांचा समावेश होता. 8 एप्रिल ते 22 मे या कालावधीत या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. स्पर्धेतील विजेत्या तीन गावांना प्रत्येकी अनुक्रमे 50 लाख, 30 लाख आणि 20 लाख रुपयांची रोख बक्षीसं दिली जाणार आहेत.

LEAVE A REPLY

*