आमदार सीमा हिरेंची ऑडिओ क्लिप व्हायरल ; भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

0

नाशिक : भाजपमधील पक्षांतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मनपा निवडणुकीत उमेदवारीवरून दोन व्हिडीओ क्लिप्स व्हायरल झाल्यामुळे बदनामी झाली होती. निवडणुकीनंतरही आज भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्या ऑडिओ क्लिपमुळे भाजपमधील अतंर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.

भाजप आमदार सीमा हिरे यांनी नाशिक महापालिकेसाठी पक्षविरोधी कारवाई केल्याचा आरोप केला जात आहे. फक्त 1 मत आम्हाला द्या, बाकीच्या 3 उमेदवारांना मत देऊ नका, अशा आशयाची सीमा हिरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

त्यामुळे पक्षाचे पराभूत उमेदवार अमोल पाटील यांनी पक्षश्रेष्ठी, मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांकडे सीमा हिरे यांची तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आमदार सीमा हिरे अडचणी आल्या आहेत.

सीमा हिरे यांचे दीर नाशिक महापालिकेच्या निवडणूक रिंगणात उभे होते. मात्र त्यांना वगळून प्रभागातील इतर कोणत्याही भाजपच्या उमेदवाराला मत देऊ नका असे आवाहन करणारे मोबाईल रेकॉर्डिंग ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे.

या ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळण्यात आली नाही. दरम्यान, भाजपच्या उमेदवारांना पक्षातच विरोध झाला होता आणि काहींनी पक्षविरोधी कामेदेखिल केली होती म्हणून भाजपचा मोठा विजय हुकल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले होते.

LEAVE A REPLY

*