आत्मनिर्धारपूर्वक काम केल्यास यश

0

कवी लहू कानडे यांचे प्रतिपादन; एमआयडीसीमध्ये पुरस्कार वितरण

अहमदनगर (प्रतिनिधी) – आपण कोणत्या क्षेत्रात काम करतो, यापेक्षा कसे करतो हे महत्वाचे आहे. मग अशा क्षेत्रात यश मिळविण्यासाठी आत्मनिर्धारपूर्वक काम करण्याची गरज असल्याचे मत कवी लहू कानडे यांनी व्यक्त केले. कामगार संघटना महासंघ व आत्मनिर्धार फाउंडेशनतर्फे आयोजित कामगार दिन व पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात कानडे बोलत होते.

यावेळी कॉ. स्मिता पानसरे, कॉ. बन्सी सातपुते, प्राचार्य अशोक शिंदे, सहाय्यक विक्रीकर आयुक्त दत्तात्रय भिसे, कॉ. सुभाष लांडे, कॉ. मेहबूब सय्यद, महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष भगवान श्रीमंदिलकर, भीमराव उल्हारे, पं.स. सदस्य डॉ. दिलीप पवार, विलासराव लामखडे, अतुल लहारे, संजय गेरंगे, डॉ. बी.एम. शिंदे, कामगार नेते कॉ. भैरवनाथ वाकळे, ह.भ.प. भगवान घुगे शास्त्री, प्रा. बापु चंदनशिवे, आत्मनिर्धार फौडेशनचे अध्यक्ष महादेव गवळी, आदी मान्यवर उपस्थित होते. कामगारदिनी कुटूंब मेळाव्याचे जिल्ह्यात प्रथमच आयोजन करण्यात आले होते.
कै. संतोष किसन गवळी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आत्मनिर्धार पुरस्कार व फाऊंडेशनच्यावतीने प्रथमच कॉ. गोविंद पानसरे आदर्श कामगार पुरस्कार वितरण जेष्ठ कवी व माजी सनदी अधिकारी लहू कानडे यांच्या हस्ते करण्यात आले. भांडवलशाही व्यवस्था व त्यांच्या हितासाठी काम करणार्‍या कामगर संघटनांच्या कचाट्यात कामगार व कष्टकरी वर्ग पिचला जात आहे. कामगार संघटना महासंघाच्या माध्यमातून कामगार चळवळीला योग्य बळफ दिले जात आहे. कामगार कायद्यात सुधारणा करुन त्यांची कडक अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे मत सहाय्यक कामगार आयुक्त दत्तात्रय भिसे यांनी व्यक्त केले. भारुड सम्राट हमिद सय्यद यांच्या भारुडाच्या रंगी या कार्यक्रमास उपस्थितांनी दाद दिली. त्यांच्या प्रबोधनपर गीतांमधून त्यांनी व्यसनमुक्ती, आदी विषयांवर प्रकाश टाकला. त्याच बरोबर उध्दव के.पी. प्रस्तुत स्मार्ट होम मिनिस्टर कार्यक्रमाचा महिलांनी आनंद लुटला. कामगार नेते कॉ. भैरवनाथ वाकळे, रामदास वागस्कर, आत्मनिर्धार फौडेशनचे अध्यक्ष महादेव गवळी, संतोष शिंदे, सिद्धिनाथ मेटे महाराज, सचिन चोभे, प्रा. मछिंद्रनाथ म्हस्के, योगेश गेरंगे,आदींनी परिश्रम घेतले. कॉ. मेहबूब सय्यद यांनी कामगार संघटना महासंघाची भूमिका व दिशा स्पष्ट केली. तर महादेव गवळी यांनी आत्मनिर्धार फाऊंडेशनच्या कामकाजाविषयी माहिती दिली.

गौरविलेले पुरस्कारार्थी
जीवनगौरव – कँप्टन विठ्ठलराव सोसे, उद्योजक हाजी नजीर शेख, साहित्य संदीप काळे, पत्रकार दीपक कांबळे व रोहित वाळके, रेडिओ किरण डहाळे, पत्रकारितेतर कर्मचारी नवाब शेख, शेती संदीप गेरंगे व क्रीडा शबनम शेख आणि आदर्श कर्मचारी गजानन व्यापारी, सुरेश बोरगे, मालनबी शेख व भगवान कचरे आदी. तसेच उद्धव काळापहाड प्रस्तुत होम मिनिस्टर कार्यक्रमात बक्षिस पटकाविलेल्या विजेत्या महिला अशा : सुशीला सातपुते, स्वाती झिने, यास्मिन शेख, तारा काळे आदी.

LEAVE A REPLY

*