आता अलाहाबाद शहरात धावणार फक्त ‘सीएनजी’ वाहने

0

हवा, पाणी प्रदूषित झाल्याचा विपरित परिणाम सर्वांनाचा भोगावा लागतो आहे. या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या उपाययोजना वेगवेगळ्या ठिकाणी केल्या जातात. असाच एक नवा निर्णय अलाहाबादमधील परिवहन विभागाच्या विभागीय आयुक्तांनी घेतला आहे. त्यामुळे येत्या २० जूनपासून अलाहाबाद शहरातील रस्त्यांवर केवळ सीएनजी गाड्याच धावू शकणार आहेत.

अलाहाबादमधील वाढते प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे शहराचे विभागीय आयुक्त आशिष गोयल यांनी सांगितले.

ते म्हणाले, शहरातील रस्त्यांवर २० जूनपासून केवळ सीएनजीवर चालणाऱ्या बसेस, रिक्षा आणि टेम्पोच धावू शकतील. अन्य इंधनावर चालणाऱ्या या स्वरुपाच्या वाहनांना शहरात प्रवेश नाकारण्यात येईल.

त्याचबरोबर सीएनजीवर चालणाऱ्या गाड्यांना वेगळा रंग असेल. बसेसचे मार्गही निश्चित करण्यात येतील आणि वेगळे असतील. अलाहाबादच्या ग्रामीण भागातही काही प्रमाणात या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल. ग्रामीण भागामध्ये सीएनजीवर चालणाऱ्या बस आणि टेम्पोंना प्राधान्य देण्यात येईल.

LEAVE A REPLY

*