आता…अपंगाना सर्व सुविधासाठी नविन युनिक कार्ड मिळणार

0

चाळीसगाव | प्रतिनिधी :  देशात कुठेही चालणारे व अपंगाना विविध सुविधाचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनाच्यावतीने, आता अपंगासाठी नविन युनिक कार्ड(ओळखपत्र) देण्यात येणार आहे. हे कार्ड आधारकार्ड प्रमाणे असून अपंगाच्या टक्केवारी नुसार हे कार्ड तीन रंगात मिळणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकात स्वयंदिप संस्थेच्या अध्यक्षा मिनाक्षी निकम यांनी दिली आहे.

सर्व अपंगांकडे एकच विशिष्ट प्रकारचे कार्ड(ओळखपत्र) असायला हवे, म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या अपंगांच्या ओळखपत्रासाठी शासनाने मान्यता दिली आहे. त्यासंबंधीचा जी.आर.२०१५ शासनाच्यावतीने काढण्यात आला होता.

परंतू त्याची अमंलबाजवणी दि.१ एप्रिल २०१७ पासून करण्यात आली आहे. शासनाच्यावतीने आता सर्व अपंगाना आधारकार्ड प्रमाणे युनिक कार्ड दिले जाणार आहे. या कार्डवर अपंगांना सर्व सुविधा मिळणार आहे. हे कार्ड तीन रंगात दिले जाणार आहे. ४० टक्के अपंगांना पिवळ्या रंगाचे कार्ड दिले जाणार आहे. ४० ते ७० टक्के पर्यंत अपंगांना निळा रंगाचे कार्ड दिले जाणार आहेत. तर ७० टक्केपेक्षा अधिक अपंगाना लाल रंगाचे कार्ड मिळणार आहे.

अपंगासाठी हे कार्ड अत्यंत महत्वाचे असून आधिक माहिती शासनाच्या वेबसाईट आपले सरकार गर्व्हेमेंट डॉट.कॉम. मिळू शकते. तसेच महाराष्ट्रातील राज्य परिवहन प्रवासासाठी नवीन यु.आय.डी.कार्ड ह्या युनिक कार्डसाठी बंधनकारक आहे. अपंग बाधंवानी युनिक कार्डसाठी समाज कल्याण अधिकारी जळगांव. किवा अपंग विकास बहुउद्देशीय संस्था(भारती चौधरी मो.८३०८०३१११८) यांच्याशी संपर्क साधायचा आहे.

देशभरात किती अपंग आहेत, त्यांच्या अपंगत्वाची टक्केवारी किती आहे याची इत्यंभूत माहिती आता अधिकृत एकत्रित होणार आहे. केंद्र शासनाच्यावतीने सुरू झालेल्या युनिक आयडीच्या सुविधेतून ही माहिती पुढे येणार आहे. याचा फायदाही अपंगांना मिळणार आहे.

1

हे रंगीत कार्ड आधार कार्डप्रमाणे देशात एकच असणार आहे. या कार्डवर अपंगांसाठी असलेल्या सुविधा देशात कोठेही घेता येणार आहेत. आधार कार्ड युनिक कार्डशी लिंक असेल. फोटोसह पूर्ण नाव, पत्ता, मोबाइल क्रमांकासह इतर माहिती कार्डवर असणार आहे.

अपंगांच्या सर्व सुविधांसाठी एकच कार्ड पुरेसे ठरणार आहे. त्यामुळे हे कार्ड म्हणजे अपगांसाठी एक महत्त्वाचा ऐवज ठरणार आहे. मोबाइल आणि ईमेलवर योजनांची माहितीयुनिक आयडीमध्ये संबंधितांनी स्वतःचा मोबाइल क्रमांक आणि इमेल आयडी रजिस्टर करावा लागणार आहे.

त्यावर अपंगांच्या विविध योजना, त्यांची माहिती, परिपत्रकांची माहिती मोबाइलवर आणि ईमेलवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे अपंगांना त्यांच्या सुविधांसाठी कोणत्याही कार्यालयात फेर्‍या मारण्याची गरज राहणार नाही.
कार्ड मुळे अपंगांची दिशाभूल होणार नाही. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही ह्या अशा प्रकारच्या कार्डसाठी पाठपुरवा करीत आहे.

आता शासनाच्यावतीने १ एप्रिल पासून प्रत्यक्षात कार्ड द्यायला सुरु केल्याने आनंद होत आहे. अपंगाना मिळणार्‍या सुविधा बाबत आता ह्या कार्डमुळे कुठल्याही प्रकारची दिशाभूल होणार नाही. तसेच त्यांची दलालांमार्फत फसवणूक देखील होणार नाही.

शासनाकडून जरी आता युनिक कार्डची नांव नोंदणी सुरु असली, तरी प्रत्यक्षात अपंगाना कार्डव्दारे लाभ मिळल्यावर त्यांचे महत्व ठरणार आहे.
मिनाक्षी निकम
अध्यक्ष (स्वयंदिप अपंग विकास बहुउद्देशिय संस्था)

LEAVE A REPLY

*