आज नगरमध्ये सीईटी

0

परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीचा वॉच

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर जिल्ह्यासह राज्यात 11 मे रोजी होणार्‍या इंजिनीअरिंग व फार्मसी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी परीक्षेवर आता सीसीटीव्हीचे लक्ष राहणार आहे.  उद्या शहरातील 68 केंद्रांवर जिल्ह्यातील 22 हजार पेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
कोणत्याही केंद्रावर परीक्षेदरम्यान गैरप्रकार होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने जोरदार कंबर कसली आहे.  त्या केंद्रांना प्रामुख्याने प्राधान्य दिले आहे.  निवडलेल्या 68 केंद्रांपैकी 60 पेक्षा जास्त केंद्रांवर कॅमेरे असणार आहेत. त्यामुळे यंदा या परीक्षेवर संपूर्णपणे कॅमेर्‍याचा वॉच राहणार असून परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी मदत होणार आहे.
 कायदा सुव्यवस्था लक्षात घेता प्रत्येक केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरामध्ये सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत एसटीडी बुथ, झेरॉक्स, फॅक्स, दुकान, बंद ठेवले जाणार आहेत.
2 हजार 61 अधिकारी व कर्मचारी नियुक्त
68 केंद्र प्रमुख, 68 सहाय्यक, 14 समन्वय अधिकारी, 42 सहाय्यक कर्मचारी, 224 पर्यवेक्षक, 140 सहाय्यक पर्यवेक्षक, 917 समवेक्षक, 68 लिपीक, 103 वाहनचालक, 68 शिपाई, 224 पाणी वाटप कर्मचारी, 123 राखीव कर्मचारी
परीक्षेसाठी जादा एसटी बसेस
अहमदनगर (प्रतिनिधी) – सीईटी परीक्षेसाठी जिल्ह्याच्या विविध भागांतून अहमदनगर येथे येणारे विद्यार्थी व त्यांच्यासोबत इतरांच्या सोईसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध भागातील प्रत्येक आगारातून पाच जादा एसटी बसेसची सोय करण्यात आली आहे. या बसेस सकाळी 9 वाजेपर्यंत अहमदनगर येथे पोहचतील असे नियोजन करण्यात आले आहे.
परीक्षार्थींना अहमदनगर येथे येण्यासाठी गैरसोय होऊ नये म्हणून शेवगाव, जामखेड, श्रीरामपूर, राहुरी, कोपरगाव, पारनेर, संगमनेर, श्रीगोंदा, कर्जत, नेवासा, पाथर्डी, अकोले, राजूर आदी ठिकाणांहून जादा एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. तरी विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी राज्य परिवहन मंडळाच्या बसेसमधूनच प्रवास करावा, खाजगी वाहनातून प्रवास करू नये असे आवाहन ए. जी. जाधव यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*