अ‍ॅडमिशन दी एण्ड, अकरावी प्रवेश अर्ज जमा करण्यासाठी कॉलेजात झुंबड

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्य शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार जिल्ह्यात सुरू असलेली अकरावी प्रवेश प्रक्रिया आज सायंकाळी पाच वाजता थांबणार आहे. प्रवेश अर्ज जमा करण्यासाठी महाविद्यालयासमोरील प्रांगणात विद्यार्थी व पालकांची गर्दी जमली असल्याचे चित्र शहरातील महाविद्यालयात आज दिसून आले.
विज्ञान, वाणिज्य, कला यासह विविध व्यवसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी शहरातील न्यू आर्टस कॉलेज, रेसिडेशियल महाविद्यालय, सारडा महाविद्यालय, राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर कॉलेज, दादासाहेब रूपवते महाविद्यालय तसेच जिल्ह्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी व पालकांची गर्दी झाल्याचे चित्र होते.

प्रवेशाचे अर्ज जमा केल्यानंतर या अर्जाची छाननी प्रवेश कमिटीकडून करण्यात येणार आहे. 30 जून रोजी अकरावी प्रवेशाची प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. या यादीवर आक्षेप घेण्यासाठी विद्यार्थांनी 1 जुन पर्यंत मुदत देण्यात येणार आहे. 3 जुलै रोजी अंतिम यादी प्रसिध्द झाल्या नंतर विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.
दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे गुणपत्रकांचे वाटप 24 जून रोजी शाळांमध्ये करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश अर्ज जमा करण्यास सुरूवात केली. या प्रवेश अर्ज सोबत लागणार्‍या विविध कागदपत्रांच्या जुळावा जुळवीसाठी वेळ लागल्याने आज प्रवेश अर्ज जमा करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.

अकरावी प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक 

-सर्वसाधारण यादी जाहीर होण्याची तारीख – 30 जून, संध्याकाळी 5 वाजता
– अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्याची तारीख – 1 ते 3 जुलै, संध्याकाळी 5 वाजता
* पहिली यादी
– पहिली गुणवत्ता यादी – 7 जुलै, सायंकाळी 5 वाजता
– पूर्ण फी भरुन प्रवेश निश्चित करण्याची तारीख – 8, 10, 11 जुलै, सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत
* दुसरी यादी
– दुसर्‍या यादीसाठी गरज असल्यास पसंतीक्रम बदलण्याची तारीख – 12 ते 13 जुलै, सायंकाळी 5 वाजेपर्यंत
– दुसरी गुणवत्ता यादी – 17 जुलै, संध्याकाळी 5 वाजता
– फी भरुन प्रवेश निश्चित करण्याची तारीख – 17 ते 19 जुलै, सकाळी 10 ते 5 वाजता
* तिसरी यादी
– तिसर्‍या यादीसाठी गरज असल्यास पसंती क्रम बदलण्याची तारीख – 20 ते 21 जुलै, संध्याकाळी 5 वाजता
– तिसरी गुणवत्ता यादी – 25 जुलै, संध्याकाळी 5 वाजता
– फी भरुन प्रवेश निश्चित करण्याची तारीख – 26 ते 27 जुलै, सकाळी 10 ते 5 वाजता
* चौथी यादी
– चौथ्या यादीसाठी आवश्यक असल्यास पसंतीक्रम बदलण्याची तारीख – 28 ते 29 जुलै, सायंकाळी 5 वाजेपर्यंत
– चौथी गुणवत्ता यादी – 1 ऑगस्ट, संध्याकाळी 5 वाजता
– फी भरुन प्रवेश निश्चित करण्याची तारीख – 2 ते 3 ऑगस्ट, सकाळी 10 ते 5 वाजता

 

LEAVE A REPLY

*