अहमदाबादेत ‘झिका’चे तीन रुग्ण आढळले

0

 

भारतातही झिका विषाणूचे रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. देशात पहिल्यांदाच झिका विषाणूचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

हे तीनही रुग्ण अहमदाबादमधील बापूनगर परिसरातील आहेत. यामध्ये एका गर्भवती महिलेचाही समावेश आहे.

आरोग्य मंत्रालयाने आपल्या वेबसाईटवर हि माहिती दिली आहे.

झिका विषाणूची लागण होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्याचं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेनेही केले आहे. डासांना रोखण्यासाठी उपाय केल्यास झिका विषाणू रोखला जाऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.

विशेषत: गरोदर महिलांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे.

LEAVE A REPLY

*