असं का होत असावं बरं?

0

गावात असायचो तेव्हा घरातली मंडळी रोज मंदिरात जायला सांगायची. लहानपणी देवाबद्दल फार काही नव्हते पण प्रसाद मिळेल या हेतूने जायचो.

आज तीच परिस्थिती आहे. जितक्या वेळा देवळात जावं लागत नाही तितक्या वेळा डॉक्टरांकडे जावं लागतं.

घरात सतत कोणी ना कोणी आजारी असतं  हाय ब्लडप्रेशर, शुगर, डायबिटीज, डिप्रेशन, सांधेदुखी अशी आजारांची नावे जी गावात असताना माहीतही नव्हती. गावात लोकांकडे खूप पैसा नव्हता पण सगळे निरोगी होते. ना एसी , ना टी. व्ही, ना फोन , ना गाडी आणि इतर सुखसोयी नव्हत्या.

सूर्य उगवण्यापूर्वी उठायचं , काम करायच आणि नंतर सूर्य मावळल्यानंतर झोपायचं. सकस अन्न खायचं आणि चालायचं , फिरायचं. दूर मैलावर शेत किंवा शाळा असायची. गावातली मोकळी आणि शुद्ध हवा. पोळी भाजी हे गावातील साधं अन्न त्याला शहरातल्या पिझ्झा बर्गरच गंध नव्हता.

आता शहरात नोकरचाकर असतात. गाडीच्या खाली लोक उतरत नाही. त्यामुळे फार पायी चालायचा प्रश्नच येत नाही . या सगळ्याचे कारण काय ? नेहमी विचार केला जातो. आज पैसा आहे पण ती मजा नाही. आज आयुष्य एक औषधी गोळीतून दुसरी औषधी गोळी असं आहे. मित्र कमी भेटतात , डॉक्टरांना जास्त भेटावे लागते. कदाचित पैश्याच्या मागे लागायचे हे परिणाम .

 

LEAVE A REPLY

*