अशोक जैन यांना मानाचा मॅक्सेल पुरस्कार प्रदान

0

पुणे भारतात १२ कोटींहून अधिक अल्पभूधारक शेतकरी आहे.

या शेतकऱ्यांना उच्च कृषी तंत्रज्ञाना पुरवून त्यांच्या उत्पन्नात भर घालण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

मिळालेला हा पुरस्कार नम्रतेने स्वीकारला असून मी तो शेतात राबणाऱ्या माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांना अर्पण करीत आहे. असे मनोगत जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी व्यक्त केले.

फोटो कॅप्शन – भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक, तंत्रज्ञान गुरु सॅम पित्रोदा यांच्याहस्ते ‘एक्सलन्स इन आंत्रप्रेन्युअरशिप’ पुरस्कार स्वीकारता अशोक जैन शेजारी नितीन पोतदार, किरण कर्णिक आणि ज्येष्ठ संपादक कुमार केतकर.

भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक, तंत्रज्ञान गुरु सॅम पित्रोदा यांच्याहस्ते 5 मे रोजी पुणे येथे यशदा सभागृहात जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह राज्यातील उद्योजकांना मॅक्सेल पुरस्कार प्रदान करण्यात आले त्या प्रसंगी ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते.

राज्यातील उद्योजकांसाठी मानाचे असणारे ‘महाराष्ट्र कॉर्पोरेट एक्सलन्स’ अर्थात ‘मॅक्सेल पुरस्कार’ गेल्या 6 वर्षांपासून दिले जात आहेत.

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन म्हणाले की, जनकल्याणाचा दृष्टिकोन हेरुन फॉर्चुन मासिकाने जगभरातील कंपन्यांमधून जैन इरिगेशनला जगात परिवर्तन घडविणारी भारतातील एकमेव कंपनी म्हणून निवड करुन जगातील सातव्या क्रमांकाचा दर्जा दिलेला आहे.

शेती व पाणी यावरील संशोधन व विकासासाठी ३ हजार एकर जमीन असलेली जैन इरिगेशन ही एकमेव कंपनी जगामध्ये आहे.

परिश्रम, गुणवत्तेचा ध्यास, व्यवसाय शाश्वतता त्याच प्रमाणे शेतकऱ्यांचे कल्याण हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कंपनीची वाटचाल सुरु आहे.

आमचे वडिल आदरणीय भवरलालजी जैन यांनी लावलेले छोटेसे रोपटे आता वटवृक्षात परावर्तित झाले आहे. ७ हजार रुपये इतक्या भांडवलावर स्थापन झालेली ही कंपनी आता ७ हजार कोटी रुपयांहून अधिक उलाढाल करणारी आंतरराष्ट्रीय कंपनी नावारुपाला आलेली आहे.

यासोबतच दर्जेदार उत्पादने, ग्राहकांसाठी मूल्यवर्धन देखील होत आहे. आम्ही या कंपनीच्या संपत्तीचे विश्वस्त म्हणून काम करीत आहोत या संपत्तीचा विनियोग जबाबदारीने करण्यावर आमचा भर असतो.

या सोहळ्यात जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांना ‘एक्सलन्स इन आंत्रप्रेन्युअरशिप’ हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सूक्ष्म ठिबकसिंचन, पाइप्स, प्रक्रिया केलेली कृषी उत्पादने, टिश्यू कल्चर व सौर पंप आदी क्षेत्रामध्ये केलेल्या अभूतपूर्व योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.

यापूर्वी हा पुरस्कार निर्लेप उद्योग समूहाचे अध्यक्ष राम भोगले, विक्रम राजाध्यक्ष, दिपक गद्रे, सुहास काकडे, परशुराम जाधव, रवि पंडीत, किशोर पाटील, अशोक खाडे आणि भारत विकास ग्रुपचे संस्थापक हेमंत गायकवाड यांना प्रदान करण्यात आले आहे.

या पुरस्कार निवड समितीचे सदस्य जेष्ठ पत्रकार पद्मश्री कुमार केतकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

 

 

LEAVE A REPLY

*