अर्शिन…बेहतरीन! ‘द रॅली’ चित्रपटाला नगरकरांची दाद

0

अहमदनगर(प्रतिनिधी)– नगरच्या अर्शिन मेहता हिच्या बॉलीवूड पदार्पणातील दि रॅली चित्रपटाचे नगरकरांनी मनापासून कौतुक करीत तिच्या अभियन कौशल्याला अर्शिन…बेहतरीन.. अशी दाद दिली. दहावीपर्यंतचे शिक्षण नगरमध्येच घेतल्यानंतर पुण्यातून सी.ए.झालेल्या अर्शिन मेहता हिने जाहिरात क्षेत्रात यशस्वी मॉडेल म्हणून नाव कमावल्यानंतर दि रॅली हा पहिलाच हिंदी चित्रपट केला. अर्शिनची मुख्य भूमिका असलेला दि रॅली शुक्रवारी देशभरात प्रदर्शित झाला असून नगरमध्ये माय सिनेमा येथे झालेल्या प्रिमियर शोला स्वत: अर्शिन उपस्थित होते.
यावेळी मेहता कुटुंबियांसह तिचा मित्र परिवार, आप्तेष्ट, स्नेहीजन आवर्जून उपस्थित होते. सर्वांनीच चित्रपट पाहून अर्शिनच्या अभिनयाचे कौतुक करीत तिला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अर्शिनच्या या पहिल्याच बॉलीवूडपटाच्या प्रिमियरवेळी तिचे आजोबा मिनू पटेल, आई शिराज मेहता, वडील डॉ.मेहेरनोश मेहता, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.शरद कोलते, श्रीगोपाल धूत, मीनाताई मुनोत, राजेंद्र चोपडा, कर्नल राजेंद्र सिंह, मेहेर दमानिया, कलाकार शुभंकर कांबळे, अहमदनगर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.दिनेश मोरे, रोमी माकर, सुहास जाधव, राकेश गुप्ता, अमृत मुथा, माय सिनेमाचे रमेश वाबळे, गिता गिल्डा, वैशाली कोलते, स्वाती गांधी, अलका गुगळे आदी उपस्थित होते. सी.ए.असोसिएशनच्या नगर शाखेतर्फे अर्शिनचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे व्हाईस चेअरमन ज्ञानेश कुलकर्णी, परेश बोरा, समीत मुथा, माजी अध्यक्ष संजय देशमुख, सुशिल जैन, सभासद घनश्याम सोळंकी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अभिनेत्री अर्निश म्हणाली की, लहानपणापासूनच मोठ्या पडद्यावर स्वत:ला पाहण्याचे स्वप्न पाहिले होते. सी.ए.झाल्यानंतर आई वडिलांच्या प्रोत्साहनातून अभिनय क्षेत्राकडे वळले. सुरुवातीला जाहिरात क्षेत्रात मॉडेल म्हणून काम करण्याची संधी मिळाली. हे काम करत असताना प्रख्यात दिग्दर्शक दीपक आनंद यांनी दि रॅलीच्या रुपाने पहिला ब्रेक मिळवून दिला.
चित्रपटात काम करण्याचा अनुभव व आनंद वेगळाच ठरला. आज स्वप्नपूर्ती होत असताना नगरमध्ये या चित्रपटाचा प्रिमियर होत असल्याने आनंद व्दिगुणित झाला आहे. सर्व कुटुंबिय, मित्र परिवाराकडून मिळालेले पाठबळ व प्रोत्साहन यामुळेच बॉलीवूडमध्ये पदार्पण शक्य झाले असून आपल्या या पहिल्याच चित्रपटाला रसिक नगरकरांचा मोठा प्रतिसाद मिळेल, असा विश्‍वास तिने व्यक्त केला.
डॉ.कोलते म्हणाले की, अर्शिनने अभिनय क्षेत्र निवडून अतिशय परिश्रमपूर्वक त्यात यश मिळवले आहे. तिचा आतापर्यंतचा प्रवास सर्व नगरकरांसाठी अभिमानास्पद असून भविष्यातही ती उत्तुुंग कामगिरी करून नगरचा नावलौकिक निश्‍चितच वाढवेल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी.ए.ज्ञानेश कुलकर्णी यांनी केले.
डॉ. मेहेरनोश मेहता व शिराज मेहता यांनी सांगितले की, सुरुवातीपासूनच अर्शिनमध्ये ध्येयपूर्तीची प्रचंड जिद्द होती. तिच्यातील कलागुणांना वाव देत तिला प्रोत्साहित केले. तिचा पहिलाच चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर झालेला आनंद अवर्णनीय असाच आहे.

LEAVE A REPLY

*