अर्णब गोस्वामी यांची ‘रिपब्लिक टीव्ही’ वृत्तवाहिनी आजपासून सुरु

0

पत्रकार अर्णब गोस्वामी यांची बहुचर्चित ‘रिपब्लिक टीव्ही’ ही वृत्तवाहिनी आजपासून सुरू झाली. अर्णब गोस्वामी यांनी गेल्यावर्षी ‘टाईम्स नाऊ’च्या मुख्य संपादक पदाचा राजीनामा दिला होता.

आज ही वृत्तवाहिनी सुरू होताना अर्णब गोस्वामी यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी प्रेक्षकांनी दाखवलेल्या संयमाचे कौतूक केले.

तसेच आपल्याला नवीन वृत्तवाहिनी सुरू करण्यासाठी इतका वेळ का लागला?, याबद्दलचे स्पष्टीकरण दिले. टाईम्स समूहाने अर्णब गोस्वामी यांना ‘नेशन वॉन्ट्स टू नो’, ही टॅगलाईन वापरु नये, यासाठी कायदेशीर नोटीस पाठवली होती.

अर्णब यांनी त्यांच्या नव्या वृत्तवाहिनीवर नेशन वॉन्ट्स टू नो, ही टॅगलाईन वापरु नये, असे टाईम्स समूहाने नोटीसमध्ये म्हटले होते.

LEAVE A REPLY

*