अमेरिकेत व्हिसापेक्षा ९० मिनिटे जास्त थांबल्याने अॅास्ट्रेलियन नागरिकांना दोन आठवड्यांची शिक्षा

0

व्हिसाची मुदत संपल्यावरही ९० मिनिटे जास्त थांबल्याबद्दल एका अॅास्ट्रेलियन व्यक्तीला अमेरिकी अधिकाऱ्यांनी स्थानबद्ध केले होते.

आता दोन आठवड्यांनी त्याची सुटका झाली असून. विशेष म्हणजे याहून कठोर शिक्षा झाली नाही म्हणून त्याच्या कुटुंबियांनी समाधानच व्यक्त केले आहे.

बॅक्स्टर रीड असे त्याचे नाव असून त्याला २४ एप्रिल रोजी ताब्यात घेण्यात आले होते. न्यायाधीश स्टीव्हन कॅानेली यांच्यासमोर त्याचा खटला चालला. त्यावेळी त्याला अमेरिका सोडण्यासाठी १२० दिवसांची मुदत न्यायाधीशांनी दिली होती.

रीड व त्याची मैत्रिण हीथर कॅन्स्को हे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात व्हिसाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कॅनडात जात होते. त्यावेळी कॅनडाच्या सीमेवर अमेरिकी अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली होती. रीड याच्याकडे बी१/बी२ हा पाच वर्षांचा व्हिसा आहे.हा व्हिसा असणाऱ्या व्यक्तीला दर सहा महिन्यांनी देशाबाहेर जावे लागते.

मात्र कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी त्याला रात्री दीड वाजेपर्यंत ठेवून घेतले. त्यावेळी त्याची सहा महिन्यांची मुदत संपून ९० मिनिटे झाली होती. मग अमेरिकी सीमेत येताच त्याला ताब्यात घेण्यात आले. अखेर बुधवारी न्यायालयाच्या आदेशावरून त्याची मुक्तता झाली.

मात्र त्याला दोन आठवड्यांचीच शिक्षा झाली, याबद्दल त्याच्या वकील जुली क्रूगर यांनी समाधान व्यक्त केले. त्याची हकालपट्टी करण्यात आली असती, तर तो परत कधीही अमेरिकेत परतू शकला नसता, असे त्या म्हणाल्या.

LEAVE A REPLY

*