अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीत भारतीय जोडप्याची गोळ्या झाळून हत्या

0
अमेरिकेत एका भारतीय जोडप्याला गोळ्या झाळून खून केल्याची घटना घडली आहे.
सॅन जोस येथे सिलिकॉन व्हॅलीत काम करणाऱ्या नरेन प्रभू आणि त्यांची पत्नीची घरातच हत्या करण्यात आली.
वर्णद्वेषी हल्ला नाही : पोलीस
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, सूड बुद्धीनेच मिर्झआ टॅटलिक या व्यक्तीने हा गोळीबार केला. हल्लेखोर मिर्झा पोलीस चकमकीत ठार झाला आहे. पोलिसांनी हे कृत्य वर्णद्वेषी असण्याची शक्यता स्पष्टपणे फेटाळून लावली आहे.
मुलीचा एक्स बॉयफ्रेंड होता हल्लेखोर…
– अमेरिकेतील स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, “सॅन जोस पोलीस प्रमुख अॅडी ग्रेशिया यांनी हल्लेखोराचे पीडित प्रभू जोडप्याच्या मुलीसोबत प्रेम प्रसंग होते. घटनेच्या वेळी दांपत्याची मुलगी घरात नव्हती.
– मिर्झा आणि प्रभू यांच्या मुलीचे प्रेम संबंध तुटले होते. हल्लेखोराला यापूर्वीही घरात हिंसाचार प्रकरणी अटक झाली होती. प्रभू यांच्या 20 वर्षीय मुलानेच पोलिसांना ही माहिती दिली.

LEAVE A REPLY

*