TWEET: अमिर खान आणि कतरिना पुन्हा एकत्र दिसणार!

0

अभिनेता आमिर खान, दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्य आणि ‘यशराज फिल्म्स’ या त्रिकुटामध्ये ‘धूम ३’मधील आणखी एका व्यक्तीची एण्ट्री झाली आहे.

ती म्हणजे अभिनेत्री कतरिना कैफ. आगामी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटासाठी कतरिनाची निवड झाली असल्याची माहिती आमिरनेच त्याच्या ट्विर अकाऊंटवरुन दिली.

‘अखेर आम्हाला आमची शेवटची ‘ठग’ मिळाली… कतरिना कैफचं मी स्वागत करतो’, असं ट्विट करत आमिरने तिचं ‘ठग्स….’च्या टीममध्ये स्वागत केलं आहे.

आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांच्य मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटामध्ये ‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेखही झळकणार असल्यामुळे हा चित्रपट खऱ्या अर्थाने मल्टीस्टारर ठरत आहे.

LEAVE A REPLY

*