अभियांत्रिकी शिक्षणावर आधारीत लघुपट ‘मॅन्युफॅक्चरिंग इंजिनियर्स’

0
भूषण खैरनार ब्राम्हणपुरी ता. शहादा / अभियांत्रिकी शिक्षणाबाबत अवाजवी अपेक्षा आणि फरफट या समस्या दाखवण्याच्या हेतूने ‘मॅन्युफॅक्चरिंग इंजिनियर्स’ या लघुपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
या लघुपटाचे दिग्दर्शन, लेखन अनेक वर्ष शहादा येथे वास्तव्यास असलेल्या व सध्या चाळीसगांव येथील हर्षल राजेंद्र गवळी या तरुणाने केले आहे.
या लघुपटातील प्रमुख भूमिका देखिल हर्षलनेच केली आहे. ‘मॅन्युफॅक्चरिंग इंजिनियर्स’ ह्या लघुपटाचे प्रदर्शन आगामी मराठी चित्रपट ‘होस्टेल डेज’च्या सेटवर करण्यात आले.
त्यावेळी दिग्दर्शक अजय नाईक व अभिनेते आरोह वेलणकर यांच्या हस्ते करण्यात आले. लघुपट प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसातच इंटरनेटच्या माध्यमातून हा लघुपट हजारोंच्या संख्येत लोकांनी पाहिला.

आज अनेक शिक्षण संस्थांमधून होणारे शिक्षणाचे बाजारीकरण विद्यार्थ्यांच्या मुळ उन्नतीकडील दुर्लक्ष बोलणार्‍या किवा लढणार्‍या विद्यार्थ्यावर नजर असणे, त्यांना त्रास देणे अशा समस्या पालकांच्या होणारी धावपळ, केवळ पदव्या देणे-घेणे या कारणाने विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळत नाही. त्यांना मार्गदर्शनही केले जात नाही.

त्यामुळे आज इंजिनियर्स ची एवढी बिकट परिस्थिती झाली आहे, जसे कंपनी मधून प्रॉडक्ट बाहेर पडते, तसे इंजिनियर्स पदव्या घेउन बाहेर पडत आहेत.

पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही. त्यामुळे वाढणारी बेरोजगारी यासारखे समस्या निर्माण होत आहेत. अपेक्षा याच आहेत की काही चांगले शिक्षक व चांगल्या संस्था आहेत, ज्या मुलांना दर्जेदार शिक्षण देत आहेत.

त्यांच्या शंकांचे निरसन करीत आहेत. त्यांचे अनुकरण संगळयानीच करावे व विद्यार्थ्याच्या कधीही, कसलीही अडचण येणार नाही अशा पध्दतीने शिकविणे, या जबाबदार्‍या शिक्षकांनी, संस्थाचालकांनी आणि स्वत: विद्यार्थ्यांनी सांभाळव्यात व आपापल्या जाण ठेवावी, असे तळमळीचे, जनजाग्रुतीचे महत्वाचे व धाडसी विचार लघुपटाच्या माध्यमातून सर्वां पर्यंत पोहचविणे असे हर्षल गवळी म्हणतो.

या लघुपटाला पुण्यातील उद्योजक सागर सत्यवान भुमकर यांचे सहकार्य मिळाले. सागरने ह्या लघुपटाची निर्मिती केली आहे.

शहाद्यातील स्वप्निल आधार मोरे हा या लघुपटासाठी प्रॉडक्शन टीममध्ये काम करीत आहे. दिग्दर्शक हर्षलने या आधी शेतकरी आत्महत्तेवर आयुष्य हा लघुपट तयार केला होता.

मॅन्युफॅक्चरिंग इंजिनियर्स अशा महत्वाच्या व तळमळीच्या, जाग्रुतीच्या, जनहिताच्या विषयावर लिहिणे व निर्मिती करणे हा हर्षलचा मानस आहे.

LEAVE A REPLY

*