अभिनेत्री निधी अग्रवालला घरातून हाकलले!

0

केवळ एखाद्या मुलीचं लग्न झालेलं नाही तसेच ती चित्रपटांमध्ये काम करते म्हणून तिच्यावर घर सोडण्याची वेळ येत असेल तर… अशा प्रसंगाला नुकतंच अभिनेत्री निधी अग्रवाल हिला सामोरं जावं लागलं आहे.

एका हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या निधीला तिच्या घरमालकाने अपार्टमेंट सोडून जाण्यास सांगितले.

निधी म्हणाली की, गेल्या सहा महिन्यांपासून मी माझ्या मैत्रिणींसोबत राहतेय. घर शोधणं हे खरंच खूप कठीण काम आहे.

होतकरू कलाकारांना या सोसायटीत राहू दिलं जात नाही.

मॉडेल्स किंवा कलाकार चुकीच्या मार्गाने पैसा कमवतात असा त्यांचा गैरसमज असल्यामुळे ते भाड्याने घर देण्यास घाबरतात.

माझं लग्न झालेलं नाही आणि केवळ मी एक कलाकार आहे म्हणून मला घर देण्यास नकार दिला जातोय. अभिनेता टायगर श्रॉफ याच्या आगामी ‘मुन्ना मायकल’ या चित्रपटात निधी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

LEAVE A REPLY

*