अभिनेते मिलिंद शिंदे करणार दिग्दर्शन! प्रमुख भूमिकेत दिसणार भूषण प्रधान आणि संस्कृती बालगुडे

0

आपल्या अभिनयाने स्वत:चे स्थान निर्माण केलेले अभिनेते मिलिंद शिंदे आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

मिलिंद शिंदे यांनी दिग्दर्शन करण्याची ही पहिली वेळ नाहीये. त्यांनी या पूर्वी नाच तुझंच लगीन हाय आणि भिडू या दोन चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

ते दिग्दर्शित करीत असलेल्या नव्या चित्रपटाचे शीर्षक अद्याप गुलदस्त्यात असून या चित्रपटाची ग्रामीण पार्श्वभूमी असणार आहे.

ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित ते एका स्पोर्ट्स फिल्मचे दिग्दर्शन करत असून राधे मोशन पिक्चर्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद किरण बेरड यांनी लिहिले आहेत. सध्या या चित्रपटाचे शूटिंग शिर्डी येथे सुरू आहे.

मराठी चित्रपट रसिकांसाठी थोडा वेगळा विषय या चित्रपटातून मांडला जाणार आहे. शिवछत्रपती पुरस्कारात डावललेला एक खेळाडू काही कारणाने आपल्या गावी परत जातो.

गावातल्या चोरी करणाऱ्या तीन मुलांना खेळाकडे आकर्षित करून तो त्यांना राष्ट्रीय स्तरापर्यंत कसा नेतो, याची अनोखी गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटात अभिनेता भुषण प्रधान, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, उदय टिकेकर, अभिजित चव्हाण, नयन जाधव, प्रकाश धोत्रे अशी स्टारकास्ट असून प्रताप नायर या चित्रपटाचे कॅमेरामन आहेत तर मंगेश धाकडे हे या चित्रपटाला संगीत देणार आहेत.

LEAVE A REPLY

*